भारतीय क्रिकेटपटू लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या प्रेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. लोकेश राहुलच्या वाढदिलवशी अथियानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून प्रेमाची जाहीर कबुली दिली. लोकेशनंही त्याला प्रतिसाद दिला. लॉकडाऊनमध्ये दोघं एकमेकांना मिस करत आहेत. पण, सोशल मीडियावरून ते एकमेकांशी रोज चर्चा नक्की करत असतील. चर्चाच नव्हे तर हे कपल ऑनलाईन ल्युडोही खेळत आहेत आणि त्यात लोकेशनं बाजी मारली. आता लोकेशनं सोशल मीडियावर एक सल्ला मागितला आणि अथियानं त्याला ट्रोल केले.
लॉकडाऊनमध्ये घरीच बसलेल्या क्रिकेटपटूंना आपल्या हेअरस्टाईलचीही चिंता लागलेली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी नव्या लुकचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला होता. लोकेशही नव्या लुकबाबत संभ्रमात पडला आहे. त्यामुळे त्यानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून केसं कापू की नको? असा सल्ला विचारला.
लोकेशला यावरून अनेक विचित्र सल्ले मिळाले. यात अथिचाही समावेश होता. काही फॅन्सने त्याला टकला होण्याचा सल्ला दिला, तर काहींनी केसं वाढवण्यास सांगितले. लोकेशची मैत्रीण आणि अभिनेत्री अकांक्षा कपूर म्हणाली की,’’ तू वेडा झाला आहेस का.’’ तिच्या या कमेंटवर अथियानं लिहीले की,’’बदला घेतला जाईल.’’ या फोस्टसह तिनं ल्युडोचा इमोजीही पोस्ट केला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार
विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?
Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!
स्टार फुटबॉलपटूच्या आईचं 22 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत Break Up; कारण ऐकून बसेल धक्का
Big News : Corona Virus च्या संकटात ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती
Web Title: KL Rahul asked for advice on social media, girlfriend Athiya Shetty said ... svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.