केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ

KL Rahul Athiya Shetty Baby Daughter Name: २४ मार्चला राहुल-अथियाला झाली 'कन्यारत्न' प्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:45 IST2025-04-18T14:43:19+5:302025-04-18T14:45:26+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul Athiya Shetty daughter name revealed Evaarah which has special meaning gift of god Instagram post social media | केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ

केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KL Rahul Athiya Shetty Daughter Name Revealed: भारताचा अनुभवी क्रिकेटपटू लोकेश राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी आपल्या चाहत्यांसोबत काही दिवसांपूर्वीच गोड बातमी शेअर केली होती. लोकप्रिय जोडीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर करत कन्यारत्न प्राप्ती झाल्याची माहिती दिली होती. आई-बाबा झाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सची बरसात झाली होती. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा केएल राहुल पहिली मॅच सोडून आथियाने बाळाला जन्म देताना सोबत होता. आता या जोडीने त्यांच्या लेकीचं नाव रिव्हिल केलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव इवारा Evaarah असं ठेवलंय.

इवारा शब्दाचा अर्थ काय?

केएल राहुल आणि अथिया शेट्टी या जोडीने आपल्या लेकीसह फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत राहुल, अथिया आणि चिमुकली लेक तिघेही दिसत आहेत. पण लेकीचा चेहरा मात्र अद्याप दाखवलेला नाही. या इन्स्टाग्राम पोस्टसह त्यांनी कॅप्शनमध्ये आपल्या लेकीचे नाव रिव्हिल केले आहे. त्यांनी लेकीचे नाव Evaarah इवारा असं ठेवलं आहे. या शब्दाचा अर्थ म्हणजे 'देवाने दिलेली भेट' ( Gift of God ) किंवा दैवी देणगी असा आहे. आमची चिमुकली लेक हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे, असेही पोस्टमध्ये लिहिले आहे.


२४ मार्चला झाला जन्म

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले होते. ज्यात अथिया शेट्टी बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती. आयपीएल स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून बाहेर पडत पहिली मॅच खेळण्याऐवजी केएल राहुलने घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. लोकेश राहुलने सोमवारी पत्नी आथियासह इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झाल्याची माहिती दिली. या जोडप्याने दोन हंसांचे एक खास पोस्टर शेअर करत मुलगी झाली हो... अशी माहिती चाहत्यांना दिली होती. मुलीचा जन्म हा २४-०३-२०२५ या तारखेला झाल्याचा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला होता.


दरम्यान, अथिया शेट्टी आणि केएल राहुल या जोडीने नोव्हेंबर २०२४ मध्ये दोघांच्या आयुष्यात सुंदर क्षण येणार असल्याचे सांगत प्रेग्नंसीची घोषणा केली होती. २०२५ मध्ये बाळाचे स्वागत करण्यासाठी आतूर आहोत, असा उल्लेखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता.

Web Title: KL Rahul Athiya Shetty daughter name revealed Evaarah which has special meaning gift of god Instagram post social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.