भारतीय क्रिकेटर लोकेश राहुल 'कॉफी विथ करण' या टेलिव्हिजनवरील शोमधील वादग्रस्त मुद्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. २०१९ मध्ये कॉफीच्या बहाण्यानं तो हार्दिक पांड्यासह बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमातील वक्तव्यामुळं चांगलाच वाद निर्माण झाला होता. या मुद्यावरून हार्दिक पांड्यासह लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. जवळपास चार वर्षे लोकेश राहुल या प्रकरणावर मौन बाळगून होता. अखेर त्यानं हे मौन सोडलं आहे.
कधी शाळेतही अशी वेळ आली नाही, 'कॉफी विथ करण'मधील वादावर पहिल्यांदा व्यक्त झाला KL राहुल
निखिल कामथसोबत पॉडकास्ट शोमध्ये गप्पागोष्टी करताना लोकेश राहुलनं चार वर्षांपूर्वी जे घडलं त्यानंच आयुष्यावर कसा परिणाम झाला ते सांगितलं आहे. शाळेत असतानाही माझ्यावर कधी निलंबित होण्याची वेळ आली नव्हती. पण या प्रकरणात मला मोठा धक्का बसला होता. 'कॉफी विथ करण' हा शो प्रसारित झाला त्यावेळी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते. या कार्यक्रमातील वादामुळे दोघांवर निलंबनाची कारवाई झाली. परिणामी त्यांना मायदेशी परतावे लागले होते.
लोक उठता-बसता ट्रोल करत होते, पण...
ती मुलाखत एका वेगळ्या दुनियेतील होती. त्यानंतर लोक मला उठता बसता ट्रोल करत होते. त्या मुलाखतीनं माझं आयुष्यच बदलले. पण ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून शांत राहायचं ठरवलं. जीभेवर संयम ठेवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या शोमध्ये वाद निर्माण होण्यापूर्वी मोठ्या ग्रुपसमोर अगदी आत्मविश्वासाने ओणि सहज बोलू शकत होतो. पण या प्रकरणानंतर स्वत:वर मर्यादा घातल्या. कमी संवाद साधण्यवर भर दिला. त्यानंतर मी टीम इंडियाकडून खेळतो. मला आत्मविशास मिळाला, अशी गोष्ट त्याने शेअर केली आहे.
करणची 'कॉफी' नको रे बाबा, क्रिकेटर्संनी या शोकडे फिरवली पाठ
'कॉफी विथ करण' या शोमध्ये करण जोहर सेलिब्रिटींची फिरकी घेत शोमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्यासोबतच्या गप्पा क्रिकेटर्संना चांगलीच महागात पडली होती. या वादग्रस्त घटनेनंतर एकाही क्रिकेटरनं या शोमध्ये जाण्याचं धाडस केलं नाही.