भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत लोकेश राहुलनं सर्वाधिक 224 धावा करताना मालिकावीर हा पुरस्कार पटकावला. या मालिकेतील दमदार कामगिरीचा लोकेशला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 क्रमवारीत फायदा झालेला आहे. लोकेशनं आयसीसी ट्वेंटी-20च्या फलंदाजांच्या क्रमवारीत गरुड झेप घेताना कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी पटकावली. लोकेशसह रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांनीही क्रमावारीत सुधारणा केली आहे.
NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार?
या मालिकेत लोकेश राहुल फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिकेत होता. या दोन्ही भूमिका त्यानं चोख पार पाडल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये लोकेश अव्वल स्थानी आहे. त्यानं 56 च्या सरासरीनं 2 अर्धशतकांसह 224 धावा चोपल्या. विशेष म्हणजे या मालिकेतून दोनशेहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. लोकेशनं या कामगिरीसह जागतिक क्रमवारीत चार स्थानाची सुधारणा करताना दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
रोहित शर्मानंही तीन स्थानांच्या सुधारणेसह टॉप टेनमध्ये पुन्हा एन्ट्री घेतली आहे. श्रेयस अय्यर 55व्या, तर मनीष पांडे 58व्या स्थानावर आला आहे. या दोघांनी अनुक्रमे 63 व 12 स्थानांनी वर झेप घेतली आहे. टॉप टेनमध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. कर्णधार विराट कोहलीनं 9 वे स्थान कायम राखले आहे. या मालिकेत त्यानं 105 धावा केल्या आहेत.
गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराहनं 26 स्थानांच्या सुधारणेसह 11वे स्थान पटकावले आहे. युजवेंद्र चहल 30व्या, तर शार्दूल ठाकूर 57व्या स्थानावर आला आहे. नवदीप सैनी 71व्या आणि रवींद्र जडेजा 76 व्या स्थानी आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 16व्या स्थानी आला आहे.
लोकेश राहुलचा एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार अन् विंडीज दिग्गजाचं बेस्ट ट्विट!
Video : सचिन तेंडुलकरचं 'चॅलेंज' विनोद कांबळीनं केलं पूर्ण
पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!
विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान
प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो?
विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'