India vs South Africa, KL Rahul: भारतीय संघ आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभूत झाला. त्यानंतर आजपासून वन डे मालिकेला सुरूवात झाली. विराटने टी२० किंवा वन डे संघाचे कर्णधारपद आधीच सोडले होते. त्यामुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वन डे संघाचा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार होता. पण रोहित पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी राहुलकडे देण्यात आली आणि राहुलने कर्णधार म्हणून मैदानात पाय ठेवताच एक नवा पराक्रम केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करताना केएल राहुलने इतिहास घडवला. कर्णधार म्हणून मैदानात उतरताच राहुल हा 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये कर्णधार न होता थेट ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये देशाचे कर्णधारपद भूषवणारा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी आणि आक्रमक माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली होती.
दरम्यान, भारताचा नवा कर्णधार केएल राहुल याने पहिली नाणेफेक गमावली. त्यामुळे भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. भारताच्या अंतिम ११च्या संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाले. तर IPL स्टार व्यंकटेश अय्यरला वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली. त्याशिवाय, शिखर धवन, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार या दोन अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले.
Web Title: KL Rahul creates history becomes Team India captain without leading any team in List A Cricket Equals Virender Sehwag IND vs SA ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.