Join us  

KL Rahul donated 31 Lakh : ११ वर्षांच्या वरद नलावडेला लोकेश राहुलने दिला मदतीचा हात; दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी केली ३१ लाखांची मदत

KL Rahul donated 31 Lakh for treating an 11-year-old boy - वरदचे वडिल सचिन नलावडे हे इंश्युरन्स एजंट आहेत आणि आई स्वप्ना झा या गृहिणी आहेत. डिसेंबर महिन्यात वरदच्या उपचारासाठी त्यांनी GiveIndia च्या माध्यमातून निधी गोळा करण्यास सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 3:25 PM

Open in App

KL Rahul donated 31 Lakh for treating an 11-year-old boy - भारतीय संघाचा उप कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) हा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे आणि भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यातल्या मालिकेत खेळणार नाही. पण, आज लोकेश राहुल एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. भारताच्या सध्याच्या घडीच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या लोकेशने मनाचा मोठेपणा जगाने पाहिला आहे.  दुर्मिळ रक्त विकाराशी संघर्ष करणाऱ्या ११ वर्षीय मुलाला अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी ( bone marrow transplant) तातडीने आर्थिक मदत हवी होती आणि लोकेशने ती केली.  लोकेशने या प्रत्यारोपणासाठी गरज असलेले ३५ पैकी ३१ लाख स्वतःच्या खिशातून दिले.  

वरदचे वडिल सचिन नलावडे हे इंश्युरन्स एजंट आहेत आणि आई स्वप्ना झा या गृहिणी आहेत. डिसेंबर महिन्यात वरदच्या उपचारासाठी त्यांनी GiveIndia च्या माध्यमातून निधी गोळा करण्यास सुरुवात केली. लोकेश राहुलला जेव्हा याबद्दल समजले तेव्हा त्याच्या टीमने GiveIndiaशी संपर्क साधला आणि वरदबद्दल सर्व माहिती जाणून घेतली व त्याला तातडीने आर्थिक मदत पुरवली. पाचव्या इयत्तेत शिकणारा वरद सप्टेंबरपासून मुंबईतील जस्लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथे त्याला aplastic anaemia या दुर्मिळ रक्त विकार झाल्याचे निदान झाले. त्याच्या रक्तपेशी खूपच कमी झाल्या आणि रोगप्रतिकारक प्रणालीत इन्फेक्शन झाले. त्यामुळे साधा तापही बरा होण्यास महिना लागत होता. अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा एकच उपाच यावर उरला होता.  

त्याच्या वडिलांनी PF मध्ये बचत केलेली रक्कमही काढली. वरदला क्रिकेटपटू बनायचे आहे आणि त्याच्या ११व्या वाढदिवशी त्यांनी त्याला बॅट भेट दिली होती. लोकेश राहुल म्हणाला,''वदरबद्दल जेव्हा मला समजले तेव्हा माझ्या टीमने GiveIndia शी संपर्क साधला. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली, हे जाणून मला आनंद झाला आणि आता त्याची प्रकृती चांगली आहे. त्याने लवकरच स्वतःच्या पायावर उभा राहून स्वप्नपूर्तीकडे वाटचार करावी ही माझी इच्छा आहे. माझ्या या पुढाकारानं इतरांनाही प्रेरणा मिळाली असेल आणि तेही अशा गरजूंसाठी पुढे येतील, अशी मला आशा आहे.'' वरदची आई स्वप्न यांनी लोकेश राहुलचे आभार मानले.   

टॅग्स :लोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघमुंबई
Open in App