KL Rahul, IND A vs AUS A: भारत 'अ' विरुद्ध ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील दुसरा अनपौचारिक कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या दोघांना टीम इंडियातील अन्य सदस्यांआधी ऑस्ट्रेलियाला धाडलं. दोघांना भारत 'अ' संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थानही मिळाल. पण एक हिट ठरला तर राहुलच्या पदरी पुन्हा निराशाच आली.
डावाची सुरुवात करताना ४ धावांत खेळ झाला खल्लास
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, अशी चर्चा रंगली होती. पण तो नेहमीप्रमाणे बेभरवशाचा निघाला. अनुभवी बॅटरला ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याचे चॅलेंज होते. ज्यात तो अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या पहिल्या डावात लोकेश राहुल अवघ्या एक चौकार मारत अवघ्या ४ धावा करून स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर बाद झाला.
अभिमन्यू ईश्वनसह कॅप्टन ऋतुराज गायकवाडही स्वस्तात परतला तंबूत
केएल राहुलशिवाय या सामन्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अभिमन्यू ईश्वरनही लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठला. त्याला तर खातेही उघडता आले नाही. अभिमन्यू ईश्वरनही बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघाचा भाग आहे. त्याच्याकडे रोहितचा रिप्लेसमेंटच्या रुपात पाहिले जात आहे. पण पहिल्या कसोटीनंतर आात दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातही त्याने निराश केले आहे.
आघाडीच्या फलंदाजांनी केला घोळ; ध्रुव जुरेलनं राखली लाज
अभिमन्यू ईश्वरन ०(३) आणि केएल राहुल ४ (४) या जोडीनं या सामन्यात भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली होती. दोघेही स्वस्तात आटोपल्यावर मैदानात उतरलेल्या साई सुदर्शनच्या पदरीही भोपळा आला. कर्णधार ऋतुराज गायकवाडही अवघ्या ४ धावांवर बाद झाला. आघाडीच्या चार फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आलानाहगी. देवदत्त पडिक्कल २६ (५५) आणि नितीश रेड्डी १६ (३५) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण त्यांना ही खेळी मोठी करता आली नाही. विकेट किपर ध्रुव जुरेल याने अर्धशतकी खेळीसह संघाची लाज राखणारी खेळी केली. तो शतकाच्या उंबऱठ्यावर आहे.