Join us  

KL Rahul ची आयपीएल २०२३ मधून माघार: WTC Final लाही मुकणार, टीम इंडियात कोणाला संधी मिळणार?

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 11:51 PM

Open in App

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे आणि तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याची शक्यताही कमीच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या घरच्या मैदानावरील झालेल्या लढतीत केएल राहुलला दुखापत झाली होती आणि तो वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला होता. त्याने त्यानंतर दुसऱ्याच दिवशी LSGच्या कॅम्पमधून माघार घेतली अन् उपचारासाठी मुंबईत स्कॅनसाठी दाखल झाला. 

स्कॅनच्या अहवालानंतर लोकेश राहुल जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणे अवघडच झाले आहे. ७ ते ११ जून या कालावधीत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हलवर ही WTC Final होणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे, परंतु त्यांनी घारबरण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले असले तरी परिस्थिती काही वेगळी च आहे. पण, त्याची आयपीएलमधून माघार निश्चित असून WTC Final खेळणे अवघड असल्याचे वृत्त Cricbuzz ने दिले आहे. 

राहुलला नेमकी काय दुखापत झालीय आणि ती कितपत गंभीर आहे, याबाबत अद्याप LSG व्यवस्थापनाने किंवा BCCI ने काहीच सांगितलेले नाही. त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याचे सांगण्यात आले, तर काहींनी नितंबला दुखापत झाल्याचे सांगितले आहे. १० महिन्यापूर्वी लोकेश जर्मनीहून हर्नियावर शस्त्रक्रिया करून परतला होता. लोकेशच्या जागी टीम इंडियात कोणाला संधी मिळेल, याचा निर्णय नंतर घेतला जाईल, परंतु सूर्यकुमार यादवचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.    

टॅग्स :आयपीएल २०२३लोकेश राहुलजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धालखनौ सुपर जायंट्स
Open in App