KL Rahul vs Mumbai Indians, IPL 2022 MI vs LSG: मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफान फटकेबाजी करत दमदार शतक ठोकले. रोहित शर्माने लखनौला प्रथम फलंदाजी दिली होती. याचा फायदा करून घेत लखनौने २० षटकांत १९९ धावा कुटल्या. कर्णधार राहुलने आधी क्विंटन डी कॉक आणि त्यानंतर मनिष पांडेच्या साथीने शानदार फटकेबाजी करत IPLच्या इतिहासातील तिसरे तर मुंबई इंडियन्सविरूद्धचे दुसरे शतक झळकावले. महत्त्वाची बाब, म्हणजे या शतकाच्या सोबतच त्याने IPL मध्ये इतिहास रचला.
राहुलने रचला इतिहास!
राहुल आणि डी कॉक ही जोडी मैदानात आली. डी कॉकने फटकेबाजीला सुरूवात करताच २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेच्या साथीने राहुलने डाव पुढे नेला आणि अर्धशतक ठोकले. त्यानंतर मनिष पांडेही ३८ धावांवर बाद झाला पण राहुलने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ५८ चेंडूत दमदार शतक ठोकले. विशेष म्हणजे, राहुलचा हा १००वा सामना होता. त्या सामन्यात राहुलने शतक ठोकले. असा पराक्रम याआधी IPL च्या इतिहासात कोणालाही जमला नव्हता. पाहा व्हिडीओ-
--
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉक सहाव्या षटकात बाद झाला. त्याने १३ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा केल्या. मनिष पांडेलाही सूर गवसला होता. पण धावगती वाढवताना तो २९ चेंडूत ६ चौकारांसह ३८ धावा काढून माघारी परतला. मार्कस स्टॉयनीस १० तर दीपक हुडा १५ धावांवर बाद झाला. पण कर्णधार लोकेश राहुलने शेवटपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकला. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या.
मुंबईच्या संघाने गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये चाहत्यांना निराश केले. जयदेव उनाडकटने २, फॅबियन अँलनने १ तर मुरूगन अश्विनने १ बळी टिपला. जसप्रीत बुमराहला एक गडी बाद करता आला नाही. पण त्याने सर्वात कमी धावा दिल्या. त्याने ४ षटकात २४ धावा देत
लखनौच्या फलंदाजीला काही अंशी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.
Web Title: KL Rahul hits century creates history becomes first ever batter in IPL history to score ton in 100th IPL Match MI vs LSG
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.