KL Rahul Fitness ( Marathi News ) - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या लोकेश राहुलला माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर त्याला उर्वरित मालिकला मुकावे लागले. तिसऱ्या कसोटीत लोकेस राहुलची संघात निवड झाली होती, परंतु ९० टक्के फिट असलेल्या अंतिम ११ मध्ये संधी दिली गेली नाही. तो त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA ) दाखल झाला. चौथ्या किंवा पाचव्या कसोटीतून तो पुनरागमन करेल, अशी शक्यता होती. पण, पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर झाला त्यातून लोकेश राहुलचे नाव वगळले गेले. त्यानंतर आता तो आयपीएल २०२४ व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत तरी खेळेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकेश राहुलच्या दुखापतीचं कारण बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमला कळत नसल्याने तो लंडनमध्ये गेला, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि तो आता भारतात परतला आहे. तो आता बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुढील उपचार घेणार आहोत. "त्याने लंडनमधील उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. तो रविवारी भारतात परतला आणि पुनर्वसनासाठी त्याने बंगळुरूमधील BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तपासणी केली. त्याला एनसीएकडून लवकरच रिटर्न टू प्ले प्रमाणपत्र मिळायला हवे. आयपीएलमध्ये तो त्याची योग्यता सिद्ध करण्यास उत्सुक आहे आणि भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडीसाठी शर्यतीत आहे,' असे एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
आयपीएल २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्स पहिला सामना २४ मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स याची सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी नियुक्ती केली गेली आहे. ३० वर्षीय गोलंदाजाला २०.५० कोटींत SRH ने आपल्या ताफ्यात घेतले. एडन मार्करामला त्यांनी कर्णधारपदावरून बाजूला केले आहे. कमिन्स यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्याकडून खेळला होता.