K.L. Rahul: "के.एल. राहुलमध्ये भारताचा कर्णधार होण्याचे गुण नाहीत", माजी क्रिकेटपटूने सांगितली सर्वात मोठी कमजोरी

KL Rahul : विराट कोहलीने भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता भारतीय संघाच्या पुढील कर्णधारासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात लोकेश राहुलच्य नावाचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:07 AM2021-10-04T11:07:54+5:302021-10-04T11:08:21+5:30

whatsapp join usJoin us
K.L. Rahul: "KL Rahul does not have the qualities to captain India", former cricketer Ajay jadeja says biggest weakness | K.L. Rahul: "के.एल. राहुलमध्ये भारताचा कर्णधार होण्याचे गुण नाहीत", माजी क्रिकेटपटूने सांगितली सर्वात मोठी कमजोरी

K.L. Rahul: "के.एल. राहुलमध्ये भारताचा कर्णधार होण्याचे गुण नाहीत", माजी क्रिकेटपटूने सांगितली सर्वात मोठी कमजोरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - विराट कोहलीने भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता भारतीय संघाच्या पुढील कर्णधारासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात लोकेश राहुलच्य नावाचाही समावेश आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या लोकेश राहुलच्या नेतृत्वगुणावर शंका उपस्थित केली आहे. लोकेश राहुलमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. तसेच गेल्या दोन हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना त्याच्यामध्ये एका चांगल्या कर्णधाराचे गुण दिसून आले नाहीत, असे अजय जडेजाने म्हटले आहे. ( "KL Rahul does not have the qualities to captain India", former cricketer Ajay jadeja says biggest weakness)

लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने २५ आयपीएल सामने खेळले. यातील ११ सामन्यात संघाला विजय मिळाला, तर १४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत पंजाब किंग्स दहा गुणांसह पाचव्यास्थानी आहे. रविवारी झालेल्या रोमांचक लढतीत आरसीबीने पंजाबचा सहा धावांनी पराभव केला आहे. पंजाबने १३ सामन्यापैकी केवळ ५ विजय मिळवले आहेत. 

क्रिकबझसोबत बोलताना जडेजाने सांगितले की, राहुल मृदुभाषी आहे. त्याचे वर्तन फार सौम्य आहे. हा असा गुण आहे जो तुम्हाला खेळामध्ये दीर्घकाळ टिकवून ठेवतो. पण कर्णधार म्हणून हा गुण प्रत्येक वेळी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेलच असं नाही. जडेजा पुढे म्हणाला की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतः चा विचार आणि नेतृत्व करण्याची क्षमता असली पाहिजे. मी के. एल. राहुलमध्ये आतापर्यंत असं पाहिलेलं नाही. कारण तो मृदूभाषी आहे. तसेच प्रत्येक गोष्टीत ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर तो एक दिवस भारताचा कर्णधार बनला तर तो दीर्घकाळापर्यंत ही जबाबदारी पार पाडू शकेल. कारण प्रत्येक गोष्टीत ताळमेळ साधणारी व्यक्तीच या पदावर अधिक काळापर्यंत राहू शकते. मात्र भारतीय कर्णधाराकडे आपला विचार असला पाहिजे. कारण आयपीएलच्या संघाचं नेतृत्व करण्यात आणि भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्यात खूप फरक आहे.

Web Title: K.L. Rahul: "KL Rahul does not have the qualities to captain India", former cricketer Ajay jadeja says biggest weakness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.