IPL 2024 : भारतीय संघाचा स्टार फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे आणि तो लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्याआधी बुधवारी तो मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात आई-वडिलांसह दर्शनाला पोहोचला. तेथे त्याने भक्तीभावाने दर्शन घेतले. मात्र, एका तांत्रिक कारणामुळे त्याला अजूनही LSG ताफ्यात दाखल होता आलेले नाही.
बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन करत असलेला राहुल दोन किंवा तीन दिवसांत त्याच्या LSG च्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होतं. पण, तो आज उजैनच्या महाकालेश्वर मंदिरात पहाटे ६ वाजता कुटुंबियांसह दर्शनासाठी पोहोचला. जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर क्रिकेटपासून दूर असलेल्या लोकेशचा आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ