KL Rahul creates history, IPL 2022 LSG vs RCB : संघ हरला पण लोकेश राहुलने रचला इतिहास; केला कोणालाही न जमलेला पराक्रम

लखनौचा कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक ठरलं व्यर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:07 PM2022-05-26T17:07:22+5:302022-05-26T17:07:53+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul overtakes Chris Gayle David Warner Virat to becomes first ever player in IPL History to score 600 plus runs in 4 seasons | KL Rahul creates history, IPL 2022 LSG vs RCB : संघ हरला पण लोकेश राहुलने रचला इतिहास; केला कोणालाही न जमलेला पराक्रम

KL Rahul creates history, IPL 2022 LSG vs RCB : संघ हरला पण लोकेश राहुलने रचला इतिहास; केला कोणालाही न जमलेला पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KL Rahul creates history, IPL 2022 LSG vs RCB : यंदाच्या हंगामात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा प्रवास बुधवारी संपुष्टात आला. प्ले ऑफच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लखनौचा 14 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही राहुलने IPLच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला. लीगच्या सर्वाधिक 4 हंगामात 600 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिलावहिला खेळाडू ठरला. त्याने यादीत विराट कोहली, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांना मागे टाकले.

सर्वाधिक IPL हंगामात 600+ धावा करणारे खेळाडू-

लोकेश राहुल - 4 वेळा (2018, 2020, 2021, 2022)
ख्रिस गेल - 3 वेळा (2011, 2012, 2013)
डेव्हिड वॉर्नर - 3 वेळा (2016, 2017, 2019)
विराट कोहली - 2 वेळा (2013 आणि 2016)

राहुलची संथ खेळी ठरली लखनौच्या पराभवाचे कारण

एलिमिनेटर सामन्यात बंगलोर विरुद्धच्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा कर्णधार लोकेश राहुलने संथ खेळी केली. त्याने 58 चेंडूत 79 धावांची खेळी खेळली. त्याचा स्ट्राइक रेट 136.21 इतका होता. पण तो स्ट्राईक सामन्याच्या दृष्टीने योग्य नव्हता. राहुलची संथ खेळी लखनौच्या पराभवाचे कारण ठरली. राहुलने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार लगावले.

Web Title: KL Rahul overtakes Chris Gayle David Warner Virat to becomes first ever player in IPL History to score 600 plus runs in 4 seasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.