'Give me one more chance' म्हणणारा फलंदाज लखनौच्या ताफ्यात KL Rahulच्या जागी दाखल

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 10:49 PM2023-05-05T22:49:02+5:302023-05-05T22:49:42+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul Ruled Out Of TATA IPL 2023 Due To Injury, Karun Nair To Replace Him At Lucknow Super Giants | 'Give me one more chance' म्हणणारा फलंदाज लखनौच्या ताफ्यात KL Rahulच्या जागी दाखल

'Give me one more chance' म्हणणारा फलंदाज लखनौच्या ताफ्यात KL Rahulच्या जागी दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे आणि तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या घरच्या मैदानावरील झालेल्या लढतीत केएल राहुलला दुखापत झाली होती आणि तो वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला होता. त्याने त्यानंतर दुसऱ्याच दिवशी LSGच्या कॅम्पमधून माघार घेतली अन् उपचारासाठी मुंबईत स्कॅनसाठी दाखल झाला होता आणि आज त्याने स्वतः भावनिक पोस्ट लिहून WTC Final मधून माघार घेत असल्याचे जाहीर केले. 


१० महिन्यापूर्वी लोकेश जर्मनीहून हर्नियावर शस्त्रक्रिया करून परतला होता. पण, RCBविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली आणि त्याला नाईलाजाने माघार घ्यावी लागली.  लोकेशच्या जागी लखनौ सुपर जायंट्सने करुण नायरला ( Karuna Nair) करारबद्ध केले. नायरने ७६ आयपीएल सामन्यांत १४९६ धावा केल्या आहेत. ५० लाखांच्या मुळ किंमतीत तो संघाचा भाग होणार आहे.  १० डिसेंबर २०२२ मध्ये करुण नायरने, डिअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोर चान्स असे ट्विट केले होते. तेच ट्विट लखनौने रिट्विट करून ही घोषणा केली. 

Web Title: KL Rahul Ruled Out Of TATA IPL 2023 Due To Injury, Karun Nair To Replace Him At Lucknow Super Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.