KL Rahul : लोकेश राहुल कर्णधार बनताच विराट कोहलीला मोठा झटका बसला, पाकिस्तानचा बाबर आजम पुन्हा वरचढ ठरला

ICC Men’s Test Player Rankings : भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यानं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा पहिला डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:37 PM2022-01-05T14:37:52+5:302022-01-05T14:38:17+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul shoots up in ICC Men’s Test Player Rankings, Jasprit Bumrah into the top 10, Virat Kohli sliped to 9th | KL Rahul : लोकेश राहुल कर्णधार बनताच विराट कोहलीला मोठा झटका बसला, पाकिस्तानचा बाबर आजम पुन्हा वरचढ ठरला

KL Rahul : लोकेश राहुल कर्णधार बनताच विराट कोहलीला मोठा झटका बसला, पाकिस्तानचा बाबर आजम पुन्हा वरचढ ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men’s Test Player Rankings : भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यानं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा पहिला डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीच्या ( Virat Kohli) कंबरेत उसण भरली अन् त्यानं माघार घेतली. आफ्रिका दौऱ्यावर लोकेशची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. भारतानं सेंच्युरियन कसोटीत ११३ धावांनी विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि आता लोकेशच्या नेतृत्वाखाली त्यांचे लक्ष मालिकाविजयाकडे आहे. लोकेशच्या कामगिरीला ICC कडूनही दाद मिळाली आहे. त्यानं आयसीसी कसोटी क्रमवारीत १८ स्थानांची झेप घेताना ३१वा क्रमांक पटकावला आहे. पण, विराटला मोठा झटका बसला आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम पुन्हा वरचढ ठरला आहे.

राहुलनं नोव्हेंबर २०१७मध्ये कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ८वे स्थान पटकावले होते आणि ती त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. पहिल्या कसोटीत त्यानं १२३ धावांची खेळी करताना मयांक अग्रवालसह ११७ धावांची भागीदारी केली. त्याच्या या कामगिरीवर भारतानं सेंच्युरियनवर ऐतिहासिक विजय मिळवला. येथे कसोटी सामना जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला. अग्रवाल हाही १ स्थानाच्या सुधारणेसह ११व्या, तर अजिंक्य रहाणे दोन स्थानांच्या सुधारणेसह २५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहलीची दोन स्थानांची घसरण झाली आहे आणि तो ९व्या क्रमांकावर घसरला. बाबर आजम  व दिमुथ करुणारत्ने यांनी विराटला मागे टाकले. रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहनं टॉप टेनमध्ये पोहोचला आहे, तर मोहम्मद शमीनंही झेप घेतलीय. पहिल्या सामन्यात बुमराहनं ५ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याची क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली असून तो ९व्या क्रमांकावर आहे. ८ विकेट्स घेणारा शमी दोन स्थानांच्या सुधारणेसह १७व्या क्रमांकावर आला आहे.  कागिसो रबाडाही ६व्या क्रमांकावर आला आहे. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर  १४व्या, टेम्बा बवुमा ३९व्या क्रमांकावर आले आहेत.  

Web Title: KL Rahul shoots up in ICC Men’s Test Player Rankings, Jasprit Bumrah into the top 10, Virat Kohli sliped to 9th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.