Rahul and Shreyas Iyer : आगामी आशिया चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कारण श्रीलंका आणि पाकिस्तान इथे होत असलेल्या या स्पर्धेला भारताचे दोन प्रमुख खेळाडू मुकणार आहेत. खरं तर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर मागील काही कालावधीपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहेत. अय्यर तर आयपीएलला देखील मुकला होता, तर राहुलला आयपीएलच्या मध्यातून माघार घ्यावी लागली होती. दरम्यान, आगामी आशिया चषकाच्या स्पर्धेत देखील हे शिलेदार खेळणार नसल्याचे कळते.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकासाठी तंदुरुस्त असण्याची शक्यता नाही. दोघेही खेळाडू दुखापतीतून बरे झाले आहेत आणि हे आशिया कपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसतील, असे मानले जात होते. मात्र, पुन्हा एकदा दुखापतीमुळे अय्यर-राहुलची जोडी मोठ्या स्पर्धेला मुकणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्यामुळे राहुल लवकरच पुनरागमन करेल असे अपेक्षित होते. पण, पुन्हा एकदा चाहत्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
२ सप्टेंबरला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक खेळवला जाणार आहे. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होतील. पाकिस्तान, भारत आणि नेपाळ अ गटात आहेत, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे.
आशिया चषकाचे वेळापत्रक३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल