Jason Holder, IPL 2022 SRH vs LSG Live: सनरायजर्स हैदराबादचा 'कूल' कर्णधार केन विल्यमसन याने IPLचा पहिलाच हंगाम खेळत असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हैदराबाद संघाने पहिला सामना गमावला असला तरी दुसऱ्या सामन्यासाठी संघात बदल केला नाही. लखनौ संघाने मात्र मागचा सामना जिंकूनही मोठा डाव खेळला. राहुलने स्मार्ट निर्णय घेत एका खास खेळाडूला संघात स्थान दिले. गेल्या वर्षी हैदराबाद संघाचा हुकूमी एक्का मानल्या जाणाऱ्या जेसन होल्डरला लखनौने संघात स्थान दिले. चमीराला बाहेर ठेवत त्याजागी त्याला संघात घेण्यात आले.
टॉसच्या वेळी राहुल म्हणाला, "आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. हा सध्याचा ट्रेंड आहे. आमच्या संघात एक बदल आहे. चमीराच्या जागी आम्ही जेसन होल्डरला संधी दिली आहे. नवीन चेंडूने तो चांगली गोलंदाजी करून शकतो. विशिष्ट विकेटवर वेगात बदल करण्याची कला त्याच्याकडे आहे. आम्ही खेळापूर्वी थोडा गृहपाठ केला आहे. आम्ही जेसनला लिलावात निवडले, कारण तो जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे. तो नवीन चेंडू स्विंग करू शकतो आणि प्रतिस्पर्धी संघातील तळाचे फलंदाजही झटपट बाद करू शकतो. तसेच, मधल्या फळीत त्याने चांगली कामगिरी केली आहे."
लखनौ सुपर जायंट्स संघ -लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (किपर), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान
सनरायझर्स हैदराबाद संघ - केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (किपर), एडन मार्करम, अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
Web Title: KL Rahul Smart Decision Includes All Rounder Jason Holder in Playing XI IPL 2022 SRH vs LSG Live Updates Washington Sundar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.