Join us  

IND vs SA 1st Test: शतकी खेळीमागचं सिक्रेट काय? KL राहुलने दिलं 'हे' उत्तर

KL राहुलने पहिल्या डावात केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 7:07 PM

Open in App

IND vs SA 1st Test: लोकेश राहुलने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर आणि वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला. राहुलने सामन्याच्या पहिल्याच दिवशी दमदार शतक ठोकलं. इतर फलंदाजांना फलंदाजी करणं कठीण वाटत असताना राहुलने मात्र संयमी खेळी करत शतक झळकावलं. त्याने २६० चेंडूमध्ये १२३ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत १७ चौकार आणि एक षटकार समाविष्ट होते. त्याच्या या शतकी खेळीमागचं सिक्रेट काय? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावेळी त्याने झकास उत्तर दिलं.

"मला माझ्या संघाला चांगली सुरूवात करून द्यायची होती. त्यासाठी मी एकाग्रचित्ताने फलंदाजी करण्यास सुरूवात केली. सलामी भागीदारी नक्कीच महत्त्वाची ठरणार हे माहिती होतं. पण त्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असणं महत्त्वाचं होतं. मी माझ्या फलंदाजीच्या तंत्रावर आणि पद्धतीवर थोडंसं काम केलं. माझं खेळ सुधारण्यासाठी मी खरंच खूप प्रयत्न केला. संघातून जेव्हा मला बाहेर काढण्यात आलंं तेव्हा मी खूप सराव केला. त्या सगळ्याचाच आता मला उपयोग झालं", असं गुपित त्याने सांगितलं. 

"क्रिकेट खेळताना शिस्त ही खूप महत्त्वाची असते. विराटने सांगितल्याप्रमाणे आमच्या गोलंदाजांनी खूप उत्तम कामगिरी केली. फक्त आजच नाही तर गेल्या दोन-तीन वर्षात आमची गोलंदाजी खूपच सुधारली आहे. पण हा केवळ पहिलाच सामना आहे. या विजयामुळे आम्हाला जो विश्वास मिळाला आहे तो आता आम्ही पुढील सामन्यांसाठी वापरू आणि अधिकाधिक विजय मिळवण्याचा प्रयत्न करू", असंही राहुल म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलविराट कोहलीमोहम्मद शामी
Open in App