Join us  

Sanjiv Goenka यांचा संताप, KL Rahul याची अनुपस्थिती! DC विरुद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात काहीतरी घडतंय हे नक्की...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 8:18 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात काहीतरी घडतंय हे नक्की... कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) आणि फ्रँचायझी मालक संजीव गोएंका ( Sanjiv Goenka) यांच्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीनंतर खटके उडाले होते. सामन्यानंतर गोएंका यांनी कॅमेरासमोर कर्णधार लोकेशला झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर लोकेशच्या नेतृत्वबदलाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्यात आयपीएल २०२५ मध्ये LSG लोकेशला संघात कायम ठेवणार नसल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. अशात KL Rahul ने मोठं पाऊल उचलल्याचे समजले आहे.

RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कायम राहण्यासाठी लखनौला उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. ते १२ सामन्यांत १२ गुणांसह सातव्या स्थानावर आहेत आणि दिल्ली व मुंबई यांच्याविरुद्धचा सामना जिंकून LSG ला १६ गुणांसह प्ले ऑफसाठी दावा सांगता येईल. त्यांना नेट रन रेटही सुधारावा लागेल. हे गणित लक्षात घेता दिल्ली विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. अशात १४ मे रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीसाठी लोकेश संघासोबत दिल्लीत दाखल झालेला नाही आणि त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतोय.

दरम्यान, लखनौ सध्या कर्णधार बदलाचा विचार करत नाही, पुढील दोन सामने जिंकण्यावर त्यांचे संपूर्ण लक्ष केंद्रित आहे, असे त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसेनर यांनी मंगळवारी सांगितले. राहुलने यंदाच्या पर्वात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  यष्टीरक्षक-फलंदाजने ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत. तो एका शतकापासून हुकला असला तरी त्याने तीन अर्धशतके झळकावली. LSG ने २०२२ मध्ये आयपीएलमध्ये एन्ट्री घेतली आणि राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांनी सलग दोन पर्वात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता.   

टॅग्स :आयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्सलोकेश राहुल