लखनौला मोठा झटका! मेन खेळाडू iplच्या अंतिम टप्प्याला मुकणार; कौटुंबिक कारणामुळे घेणार माघार

LSG ipl 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 03:46 PM2023-04-25T15:46:03+5:302023-04-25T15:47:21+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul's Lucknow Super Giants bowler Mark Wood likely to miss finals of IPL 2023  | लखनौला मोठा झटका! मेन खेळाडू iplच्या अंतिम टप्प्याला मुकणार; कौटुंबिक कारणामुळे घेणार माघार

लखनौला मोठा झटका! मेन खेळाडू iplच्या अंतिम टप्प्याला मुकणार; कौटुंबिक कारणामुळे घेणार माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

mark wood ipl 2023 । नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. लोकेश राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) संघ शानदार कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत जवळपास सर्वच संघांनी सहा ते सात सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ अव्वल स्थानी असून ८ गुणांसह लखनौचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच राहुलच्या संघाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण संघाचा प्रमुख गोलंदाज आयपीएल २०२३ च्या अंतिम टप्प्याला मुकणार आहे.

Espncricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लिश गोलंदाज मार्क वुड त्याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मायदेशी पतरणार आहे. मे महिन्यात वुडच्या लेकीचा वाढदिवस असून त्यासाठी तो आयपीएलमधून माघार घेणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करत आहे, त्याने आतापर्यंत ११ बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध पदार्पणाच्या सामन्यात वुडने १४ धावांत ५ बळी घेतले होते. मात्र, आजारपणामुळे मागील दोन सामन्यांत तो लखनौच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. खरं तर वुड त्याच्या दुसऱ्या मुलीच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी येत्या आठवड्यात मायदेशी परतण्याची शक्यता आहे. 

अफगाणिस्तानच्या खेळाडूला मिळू शकते संधी 
लखनौ सुपर जायंट्सचा आगामी सामना पंजाब किंग्जसोबत २८ एप्रिल रोजी होणार आहे. या सामन्यानंतर लखनौचा संघ आपल्या घरच्या मैदानावर बड्या संघांशी दोन हात करेल. १ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि ३ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जसोबत लखनौचा सामना होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे मार्क वुड मायदेशात परतल्यास त्याच्या जागी अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हकला संधी दिली जाऊ शकते. त्याने आपल्या पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: KL Rahul's Lucknow Super Giants bowler Mark Wood likely to miss finals of IPL 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.