Join us  

राहुलची फटकेबाजी नैसर्गिक, वेगाने धावा काढू शकताे

‘केएल’च्या फलंदाजीवर सुनील गावसकर खूश, टीव्हीवर कधीही फलंदाजी करताना पाहणे आवडेल असाच राहुल हा फलंदाज आहे.’ भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 5:28 AM

Open in App

मुंबई : लोकेश राहुलच्या नैसर्गिक फटकेबाजीवर तसेच वेगाने धावा काढण्याच्या शैलीवर खुश असलेले माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी, वेगवान खेळीसाठी राहुलने स्वत:च्या शैलीत कुठल्याही नव्या फटक्यांचा समावेश करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

‘स्टार स्पोर्ट्स’च्या क्रिकेट लाईव्ह या कार्यक्रमात गावसकर म्हणाले, ‘राहुल शानदार कामगिरी करीत आहे.  त्याच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य असे की, त्याच्या शैलीत काहीही बनवाबनवी वाटत नाही. तो जे फटके मारतो, ते सर्व नैसर्गिक असतात. राहुलने स्वत:च्या शैलीद्वारे सिद्ध केले की, वेगवान धावा काढण्यासाठी नव्या फटक्यांचा शोध लावण्याची काहीही गरज नाही. तुमच्याकडे शॉट असतील तर त्यांची योग्य निवड करा, हे त्याच्या खेळीतून जाणवते. राहुलच्या सर्वच फटक्यांची निवड आतापर्यंत उत्कृष्ट अशीच राहिली आहे.’

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेदेखील कर्नाटकच्या या युवा फलंदाजाचे कौतुक केले.  पीटरसन म्हणाला, ‘राहुलच्या भात्यात प्रत्येक प्रकारचे शॉट्स आहेत. तो मैदानाच्या कुठल्याही दिशेने चेंडू टोलवू शकतो. टीव्हीवर कधीही फलंदाजी करताना पाहणे आवडेल असाच राहुल हा फलंदाज आहे.’ भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला, ‘राहुल परिस्थितीचे भान राखून खेळतो. गरजेनुसार धावांची गती वाढविण्याचे कसब त्याच्या खेळात आहे. स्थितीनुसार तो धावसंख्येला आकार देण्याची क्षमता आणि कौशल्य बाळगत असल्याने  सामान जिंकण्याची संघाची शक्यता बळावते. नेमकी, कशी आणि कुठल्या क्षणी धावगती वाढवायचीय, हे राहुलला चांगले अवगत आहे.’

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असलेला सलामीवीर राहुल जबर फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके ठोकली. ही दोन्ही शतके मुंबई इंडियन्सविरुद्ध ठोकली हे विशेष.  राहुल ३६८ धावांसह राजस्थान रॉयल्सचा जोस बटलरनंतर सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :लोकेश राहुलसुनील गावसकरआयपीएल २०२२
Open in App