पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळवण्यात येणाऱ्या UAE’s International League T20 (ILT20) लीगसाठी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स या फ्रँचायझी सज्ज झाल्या आहेत. पुढील वर्षी ६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत यूएई येथे ही स्पर्धा ६ संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. प्रत्येक संघ १८ खेळाडूंना करारबद्ध करणार आहे. BCCI च्या नियमामुळे या लीगमध्ये भारतीय क्रिकेटपटू खेळू शकणार नाही. त्यामुळे परदेशी खेळाडूंची चांदी आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या MI Emirates या संघातील खेळाडूंची नुकतीच घोषणा केली आणि आज त्यांना टक्कर देण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने संघ जाहीर केला आहे.
अबु धाबी नाईट रायडर्स ( Abu Dhabi Knight Riders ) या नावाने KKRचा संघ यूएई आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त खेळणार आहे. KKR ने सुनील नरीन व आंद्रे रसेल यांना ADKR मध्ये कायम राखले आहे. त्याशिवाय जॉनी बेअरस्टो, अकील हुसैन, रवी रामपॉल, अली खान, कॉलिन इनग्राम हेही खेळाडू संघाचे सदस्य असणार आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या पॉल स्टर्लिंग, चरिथ असलंगा, केनार लुईस, लाहिरु कुमार, रेमन रीफर व ब्रँडन ग्लवर यांनाही ADKR ने करारबद्ध केले आहे.
अबु धाबी नाईट रायडर्सचा संघ - सुनील नरीन (त्रिनिदाद अँड टोबॅगो/वेस्टइंडीज), आंद्रे रसेल (जमैका/वेस्टइंडीज), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), पॉल स्टर्लिंग (आयर्लंड), लाहिरू कुमारा (श्रीलंका), चरित असलंका (श्रीलंका), कॉलिन इनग्राम (दक्षिण आफ्रीका), अकील होसेन (त्रिनिदाद अँड टोबॅगो/वेस्टइंडीज), सीक्कुगे प्रसन्ना (श्रीलंका), रवि रामपॉल (त्रिनिदाद अँड टोबॅगो/वेस्टइंडीज), रेमन रीफर (बारबाडोस/वेस्टइंडीज), केनर लुईस (जमैका/वेस्टइंडीज), अली खान (अमेरिका), ब्रँडन ग्लोवर (नेदरलँड).