Shah Rukh Khan Major League Cricket : इंडियन प्रीमिअर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक व बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने शुक्रवारी मोठी घोषणा केली. KKR मालक अमेरिकेत होणाऱ्या Major League Cricket लीगला मदत करण्यासाठी Los Angeles येथे क्रिकेटचे स्टेडियम उभे करणार आहे. २०२८ची ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन KKRने हा निर्णय घेतला आहे. १५ एकर जागेवर हा भव्य स्टेडियम उभा राहणार आहे.
''अमेरिकेत क्रिकेटची पायामुळे रुजावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आम्ही अमेरिकेत होणाऱ्या मेजर क्रिकेट लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. या निर्णयामुळे कोलकाता नाईट रायडर्स हा ब्रँड जागतिक स्थरावर आणखी मोठा होणार आहे,''असे मत मालक शाहरुख खान याने व्यक्त केले.
KKRच्या मालकी हक्काचा त्रिनबागो नाईट रायडर्स हा संघ कॅरेबियन लीगमध्ये खेळतोय. ''या लीगसाठी येथे क्रिकेट स्टेडियम तयार करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद अमेरिका व वेस्ट इंडिज यांना मिळालेले आहेच. त्यात २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. त्यामुळे Los Angeles येथे उभं राहणारं स्टेडियम खूपच फायद्याचे ठरेल.