रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा यांच्यासह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना किती मिळते मानधन, जाणून घ्या...

या खेळाडूंना वर्षाचे मानधन नेमके मिळते तरी किती, हे जाणून घ्यायचा तुम्हाला देखील उत्सुक असाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:06 PM2019-11-30T16:06:44+5:302019-11-30T16:07:33+5:30

whatsapp join usJoin us
Know how much salary Mumbai Indians players get with Rohit Sharma, Hardik Pandya, Jasprit Bumrah ... | रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा यांच्यासह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना किती मिळते मानधन, जाणून घ्या...

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा यांच्यासह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना किती मिळते मानधन, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आयपीएलचे सर्वाधिक जेतेपद पटकालेल्या मुंबई इंडियन्सने आगामी मोसमासाठी १२ खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवले आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरासह १२ खेळाडूंचा समावेश आहे. पण या खेळाडूंना वर्षाचे मानधन नेमके मिळते तरी किती, हे जाणून घ्यायचा तुम्हाला देखील उत्सुक असाल...

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला १५ कोटी रुपये एवढे सर्वाधिक मानधन मिळते. रोहितनंतर दुसरा क्रमांक लागतो तो हार्दिक पंड्याचा. हार्दिकला ११ कोटी रुपये एवढे मानधन मिळते. हार्दिकनंतर त्याचा भाऊ कृणाल पंड्याला ८.८ कोटी आणि त्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला ७ कोटी रुपये एवढे मानधन मिळते.

इशान किशनला ६.२ कोटी आणि वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डला ५.४ कोटी रुपये मिळतात. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट ३.२ कोटी रुपये आणि एवढेच मानधन सूर्यकुमार यादवलाही मिळते. यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला २.८ आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला २.० कोटी एवढे मानधन मिळत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Know how much salary Mumbai Indians players get with Rohit Sharma, Hardik Pandya, Jasprit Bumrah ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.