सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी

Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023:  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची साखळी फेरी अंतिम टप्प्यात आली आहे आणि भारत सोडल्यास उपांत्य फेरीच्या स्थानाजवळ अद्याप कोणताच संघ पोहोचलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 02:39 PM2023-11-01T14:39:42+5:302023-11-01T14:40:07+5:30

whatsapp join usJoin us
Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023: India need 1 win of 3 matches, Netherlands also have chance | सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी

सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023:  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची साखळी फेरी अंतिम टप्प्यात आली आहे आणि भारत सोडल्यास उपांत्य फेरीच्या स्थानाजवळ अद्याप कोणताच संघ पोहोचलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत सहापैकी ६ सामने जिंकले आहेत आणि १२ गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत. आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत सुरू आहे आणि या लढतीवर पाकिस्तानचे भविष्य अवलंबून आहे. पाकिस्तान व बांगलादेश यांचे ७ सामने झाले आहेत आणि स्पर्धेबाहेर होणारा बांगलादेश हा पहिला संघ ठरला आहे. उर्वरित संघांनी प्रत्येकी ६ सामने खेळले आहेत आणि त्यांच्यात उर्वरित ३ जागांसाठी कडवी झुंज आहे.

भारत
- भारतीय संघाला ३ पैकी १ विजय पुरेसा आहे
- भारताने तिन्ही सामने गमावल्यास नेट रन रेट निर्णायक ठरेल

दक्षिण आफ्रिका
- ३ पैकी २ सामन्यांत विजय 
- फक्त १ विजय मिळवल्यास नेट रन रेट निर्णायक ठरेल
 
न्यूझीलंड
- तीनपैकी ३ सामने जिंकणे गरजेचे 
- दोन विजय मिळवल्यास नेट रन रेट निर्णायक  

ऑस्ट्रेलिया 
- ३ पैकी तीन विजय मिळवणे आवश्यक
- २ विजय मिळवल्यास नेट रन रेटची भूमिका महत्त्वाची 
 
पाकिस्तान 
- २ पैकी २ सामने सर्वोत्तम नेट रन रेटने जिंकणे महत्त्वाचे
- १ विजय मिळवल्यास, न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी तिन्ही सामने हरणे गरजेचे आणि अफगाणिस्तानने २/३ सामने गमावणे महत्वाचे. त्यानंतरही नेट रन रेट निर्णायक ठरेल.

अफगाणिस्तान
- तीन पैकी तीन मॅच जिंकल्यास त्यांचे १२ गुण होतील
- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा नेट रन रेट सुधारावा लागेल
 
श्रीलंका
- तीन पैकी ३ सामने जिंकणे गरजेचे
- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यासाठी नेट रन रेट सुधारणे महत्त्वाचे
- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी ३ पैकी किमान २ सामने गमावणे गरजेचे

नेदरलँड्स
- तीन पैकी ३ सामने जिंकणे महत्त्वाचे
- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यासाठी नेट रन रेट सुधारणे महत्त्वाचे
- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी ३ पैकी किमान २ सामने गमावणे गरजेचे

इंग्लंड 
- ३ पैकी ३ सामने जिंकणे महत्त्वाचे
- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यासाठी नेट रन रेट सुधारणे महत्त्वाचे
- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी ३ पैकी ३ सामने गमावणे गरजेचे
- पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका किंवा नेदरलँड्स यांच्यापैकी एकाचेही १० गुण व्हायला नको. 
 

Web Title: Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023: India need 1 win of 3 matches, Netherlands also have chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.