Join us  

सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी

Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023:  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची साखळी फेरी अंतिम टप्प्यात आली आहे आणि भारत सोडल्यास उपांत्य फेरीच्या स्थानाजवळ अद्याप कोणताच संघ पोहोचलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 2:39 PM

Open in App

Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023:  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची साखळी फेरी अंतिम टप्प्यात आली आहे आणि भारत सोडल्यास उपांत्य फेरीच्या स्थानाजवळ अद्याप कोणताच संघ पोहोचलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत सहापैकी ६ सामने जिंकले आहेत आणि १२ गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत. आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत सुरू आहे आणि या लढतीवर पाकिस्तानचे भविष्य अवलंबून आहे. पाकिस्तान व बांगलादेश यांचे ७ सामने झाले आहेत आणि स्पर्धेबाहेर होणारा बांगलादेश हा पहिला संघ ठरला आहे. उर्वरित संघांनी प्रत्येकी ६ सामने खेळले आहेत आणि त्यांच्यात उर्वरित ३ जागांसाठी कडवी झुंज आहे.

भारत- भारतीय संघाला ३ पैकी १ विजय पुरेसा आहे- भारताने तिन्ही सामने गमावल्यास नेट रन रेट निर्णायक ठरेल

दक्षिण आफ्रिका- ३ पैकी २ सामन्यांत विजय - फक्त १ विजय मिळवल्यास नेट रन रेट निर्णायक ठरेल न्यूझीलंड- तीनपैकी ३ सामने जिंकणे गरजेचे - दोन विजय मिळवल्यास नेट रन रेट निर्णायक  

ऑस्ट्रेलिया - ३ पैकी तीन विजय मिळवणे आवश्यक- २ विजय मिळवल्यास नेट रन रेटची भूमिका महत्त्वाची  पाकिस्तान - २ पैकी २ सामने सर्वोत्तम नेट रन रेटने जिंकणे महत्त्वाचे- १ विजय मिळवल्यास, न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी तिन्ही सामने हरणे गरजेचे आणि अफगाणिस्तानने २/३ सामने गमावणे महत्वाचे. त्यानंतरही नेट रन रेट निर्णायक ठरेल.

अफगाणिस्तान- तीन पैकी तीन मॅच जिंकल्यास त्यांचे १२ गुण होतील- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा नेट रन रेट सुधारावा लागेल श्रीलंका- तीन पैकी ३ सामने जिंकणे गरजेचे- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यासाठी नेट रन रेट सुधारणे महत्त्वाचे- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी ३ पैकी किमान २ सामने गमावणे गरजेचे

नेदरलँड्स- तीन पैकी ३ सामने जिंकणे महत्त्वाचे- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यासाठी नेट रन रेट सुधारणे महत्त्वाचे- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी ३ पैकी किमान २ सामने गमावणे गरजेचे

इंग्लंड - ३ पैकी ३ सामने जिंकणे महत्त्वाचे- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यासाठी नेट रन रेट सुधारणे महत्त्वाचे- न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी ३ पैकी ३ सामने गमावणे गरजेचे- पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका किंवा नेदरलँड्स यांच्यापैकी एकाचेही १० गुण व्हायला नको.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतपाकिस्तानन्यूझीलंडआॅस्ट्रेलिया