आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणखी एका लीगमध्ये दिसणार आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीसह अनेक दिग्गज खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केलेला आहे. त्यांच्यात आता सिक्सर किंग युवीच्या नावाचा समावेश झाला आहे. निवृत्तीनंतर युवीनं ट्वेंटी-20 कॅनडा ग्लोबल लीगमध्ये सहभाग घेतला होता आणि आता तो दुबईत होणाऱ्या टी10 लीगमध्ये खेळताना दिसेल. या लीगला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे आणि युवी मराठा अरेबियन्स संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे या लीगमधील युवीची पहिली मॅच कधी, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
टी 10 लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले खेळाडू खेळणार आहेत. 2019च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघातील ट्रेव्हर बायलीस व मोईन अली हेही या लीगमध्ये दिसतील. 15 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ही लीग होणार आहे. जगभरातील विविध लीगमध्ये खेळण्यासाठी युवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर युवी टी२० कॅनडा लीगममध्ये टोरंटो नॅशनल्स संघाकडून खेळला. युवराजने सांगितले की, ‘टी10 या रोमांचक लीगमध्ये सहभागी होणे शानदार आहे. टीम मराठा अरेबियन्स संघाकडून या लीगमध्ये खेळण्यास मी सज्ज आहे.’ गेल्या सत्राप्रमाणेच या संघाचे नेतृत्त्व वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्रावोकडे असेल.
आठ संघ जेतेपसाठी भिडणारयंदा या लीगममध्ये एकूण 8 संघ जेतेपदासाठी भिडणार असून याआधीच्या दोन सत्रांमध्ये ही स्पर्धा 5 संघांमध्ये पार पडली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विदेशी लीगमध्ये खेळणार युवराज पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. टी 10 च्या वेळापत्रकानुसार लीगचा उद्घाटनीय सामना मराठा अरेबियन्स विरुद्ध नॉर्दन वॉरियर्स यांच्यात होणार आहे. म्हणजे उद्धाटनीय सामन्यातच युवीची फटकेबाजी पाहायला मिळेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
युवीच्या संघात कोण?ख्रिस लीन, ड्वेन ब्राव्हो ( कर्णधार), लसिथ मलिंगा, हझरतुल्लाह झझाई, नजीबुल्लाह झाद्रान, मोहम्मद इरफान, दासून शनाका, चॅडवीक वॉल्टन, वनिंदू हसरंगा, युवराज सिंग, मिचेल मॅकलेघन, मोहम्मद क्वासीम, शिराज अहमद, नाझीर अझीज