मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा सिनेमांचा चाहता आहे. बरेच सिनेमे त्याने पाहिले आहेत. पण या सिनेमांतील काही डॉयलॉग सचिनला चांगलेच लक्षात राहीले आहे. आज सचिनने अग्नीपथ या सिनेमातील "विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम", हा डॉयलॉग आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यावर चाहत्यांच्या उड्या पडल्या. पण सचिन असे आपल्या ट्विटरवर म्हणाला तरी का...
आपल्या ट्विटमध्ये सचिन म्हणाला आहे की, 'विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम। बाप का नाम दीनानाथ चौहान। मां का नाम सुहासिनी चौहान। गांव मांडवा। उम्र 36...' हा डॉयलॉग अजूनही माझ्या अंगावर शहारे आणतो. दुसरा अमिताभ बच्चन होणे नाही."
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. अमिताभ बच्चन यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सचिनने अमिताभ यांच्या या सिनेमातील डॉयलॉग पोस्ट केला आणि या गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही, असेही लिहिले आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते बॉलिवूडवर राज्य करत असून त्यांचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. सध्या त्यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत असून त्याला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जंजीर, शोले, डॉन, त्रिशुल, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.
प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. अमिताभ बच्चन यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहेत. आपल्या जवळजवळ दोन पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. त्यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देश तसेच देशाबाहेर असणारे अमिताभ यांचे चाहतेदेखील खूश होतील. त्यांना या पुरस्कारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.