Join us

Video : हार्दिक पांड्यानं शेअर केला वडीलांचा Emotional व्हिडीओ; म्हणाला, मला रडू आवरेना... 

हार्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी हिमांशू यांनी खूप कष्ट घेतले.

By स्वदेश घाणेकर | Updated: February 2, 2021 13:16 IST

Open in App

हार्दिक आणि कृणाल ( Hardik & Krunal Pandya) या पांड्या भावंडांवर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे वडिल हिमांशू पांड्या ( Himanshu Pandya) यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. कृणाल आणि हार्दिक यांच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्तानं क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त झाली. हिमांशू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली तेव्हा दोघाही भावांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. या धक्क्यातून सावरणे अजूनही हार्दिकला अवघड जात आहे. त्यानं मंगळवारी वडिलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि हा व्हिडीओ अजूनही डोळ्यात अश्रू आणत असल्याचे त्यानं लिहिलं.  Video : तो मुक्का जीवावर बेतला; प्रतिस्पर्धीचा चेहऱ्यावर पंच अन् बॉक्सरचा दुर्दैवी मृत्यू 

काही दिवसांपूर्वी हार्दिकनं इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. त्यावर त्यानं लिहिलं  होतं की,''तुमच्याशिवाय या घराचा विचारच करवत नाही. आमचं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहिलच. तुमचं नाव सर्वात टॉपवरच राहील. जसं तुम्ही घरात आमच्याकडे लक्ष ठेवायचात, तसंच लक्ष तुम्ही वरूनही ठेवाल, हे मला माहित्येय. आम्हाला तुमचा नेहमी अभिमान वाटतो.  rest in peace my king. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येत राहील.'' Video : चेंडू सीमारेषेपार जात असताना खेळाडू जर्सी बदलत राहिला अन् एकच हशा पिकला!

हार्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी हिमांशू यांनी खूप कष्ट घेतले. सुरत येथे हिमांशू यांचे कार फायनान्सचा बिस्नेस होता आणि तो बंद करून ते मुलांच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी वडोदरा येथे स्थायिक झाले. त्यांनी दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. गोरवा येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये ते रहायचे. हिमांशू दररोज ५० किलोमीटर बाईक चालवत कृणालला वडोदरात घेऊन जायचे. एवढेच नाही, तर ते कॉलेजच्या मुलांशी १००-१०० रुपयांची पैज लावायचे. माझ्या मुलाला जो बाद करेल त्याला १०० रुपये देईन, अशी ती पैज असायची. दीड-दोन तासांच्या फलंदाजीनंतरही त्याला कुणची बाद करू शकत नव्हता. ३४ कोटींच्या घरात राहतेय विराट-अनुष्काची लेक 'वामिका'; पाहा आलिशान घराचे Inside Photo

हार्दिकनं मंगळवारी वडीलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात हिमांशू हे नवी गाडी खरेदी करण्यासाठी एका शोरूममध्ये गेले आहेत आणि तेथे त्यांना एक गाडी खूप आवडली. हार्दिकनं आधीच ही गाडी वडीलांसाठी खरेदी केली होती, फक्त त्यांना ते सांगितले नव्हते. जेव्हा ते शोरूममध्ये गेले, तेथे त्यांना सप्राईज दिले. मुलानं दिलेलं हे सप्राईज पाहून हिमांशू भावूक झाले आणि व्हिडीओ कॉलवर असलेल्या हार्दिकचा ते मोबाईलवरच मुका घेताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्या