नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघाने केलेली धडाकेबाज कामगिरी दक्षिण आफ्रिकेच्या आजी माजी क्रिकेटपटूंच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा दौरा आटोपून अनेक दिवस लोटल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू अकारण वाद उकरून काढत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वर्तन हे विदूषकी होते. मात्र असे असतानाही आयसीसीने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, अशी टीका दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल हॅरिस याने केली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांच्यात झालेल्या वादामध्ये विराट कोहलीला ओढण्याचा प्रयत्न पॉल हॅरिसने केला आहे. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कागिसो रबाडावर दोन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. आपल्यावरील आरोप फेटाळल्यानंतर रबाडावर सामन्यातील मानधनाच्या ५० टक्के दंड आणि ३ गुणांची कपात अशी कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्याचे एकूण ८ डिमेरिट गुण झाले आणि त्याच्यावर अनिवार्यपणे दोन कसोटी सामन्यांसाठी बंदी लागू झाली. या बंदीनंतर मला स्वत:वर नियंत्रण ठेवले पाहिजे, अशा वर्तनामुळे मी स्वत:ला आणि संघाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे, अशी खंत रबाडाने व्यक्त केली.
त्याआधी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये आयसीसीने विराट कोहलीला पंचांकडे डंप बॉलबाबत तक्रार करणे आणि चेंडूला रागाने जमिनीवर आपटल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यासाठी त्याच्यावर मानधनाच्या २५ टक्के दंड आणि एका गुणाची कपात करण्याची कारवाई करण्यात आली होती.
Web Title: Kohli behaved like a Joker in SA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.