Join us  

कोहली इंग्लंडसाठी खतरनाक ठरू शकतो : ग्रॅहॅम गूच

आगामी कसोटी मालिकेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची चांगल्या कामगिरीची जिद्द यजमान संघासाठी खतरनाक ठरू शकते, असे इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहॅम गूच याला वाटते. पहिला कसोटी सामना १ आॅगस्टपासून बर्मिंगहम येथे सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 5:19 AM

Open in App

चेम्सफोर्ड : आगामी कसोटी मालिकेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची चांगल्या कामगिरीची जिद्द यजमान संघासाठी खतरनाक ठरू शकते, असे इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहॅम गूच याला वाटते. पहिला कसोटी सामना १ आॅगस्टपासून बर्मिंगहम येथे सुरू होत आहे.गूचने बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘‘विराट कोहली सध्या अव्वल रँकिंगप्राप्त खेळाडू आहे आणि माझ्या मते इंग्लंडसाठी तो खतरनाक ठरू शकतो. तो इंग्लंडविरुद्ध कामगिरी उंचावण्यासाठी जास्त प्रयत्न करेल.’’कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांच्यातील तुलनेविषयी विचारले असता गूच म्हणाला, ‘‘दोघेही क्रिकेटच्या सर्वच स्वरूपात विश्वस्तरीय खेळाडू आहेत आणि दोघेही मॅचविनर आहेत. मला या दोघांची फलंदाजी पाहण्यास आनंद वाटतो.या दोघांनी केलेल्या धावा नव्हे तर त्यांनी किती खेळ्या करून संघाला विजय मिळवून दिला हे लोकांनी लक्षात ठेवायला हवे. प्रतिकूल परिस्थितीत ५० अथवा मुर्दाड खेळपट्टीवरील १५० धावा केल्या असल्या तरी त्या खेळीने संघविजयी झाला हे तेव्हा अभिमानास्पद वाटते.’’ गूचने भारतीय संघ चांगला असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट