Join us  

कोहली पितो चार हजार रुपये प्रती लिटरचे पाणी

कोहली जिममध्ये तासनतास घाम गाळतोच, शिवाय काटेकोर डाएट प्लॅनही त्याने आखले आहेत. त्यासाठी विराट शाकाहारी बनला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 5:37 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा तंदुरुस्तीला किती महत्त्व देतो, हे सर्वांना माहीत आहे. भारतीय संघात खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी यो-यो टेस्टची संकल्पना कोहलीनेच आणली. त्यामुळेच सध्या सर्वांत तंदुरुस्त क्रिकेटपटू म्हणून कोहली आघाडीवर आहे.

कोहली जिममध्ये तासनतास घाम गाळतोच, शिवाय काटेकोर डाएट प्लॅनही त्याने आखले आहेत. त्यासाठी विराट शाकाहारी बनला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ वर्षांपूर्वी पदार्पण करणारा कोहली  आजही तितकाच तंदुरुस्त व ॲक्टिव्ह आहे. विराटच्या डाएट प्लॅनमध्ये असलेल्या पाण्यामुळेही त्याला मदत मिळते. कोहली ‘ब्लॅक वॉटर’ पितो. तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी तो  ‘ब्लॅक अल्कलाइन वॉटर’ पितो.

अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही ब्लॅक वॉटरचे सेवन करतात. ब्लॅक वॉटर तयार करण्यासाठी  ब्लॅक मिनरल्सचा वापर केला जातो. पाण्यात ७० टक्के खनिजं टाकली जातात, त्यामुळे पाण्याचा रंगही काळा होतो. यामुळेच हे पाणी साध्या पाण्यापेक्षा जास्त पौष्टिक होतं. या पाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्त्व असतात. बीपी, डायबिटिस आणि हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी हे पाणी फायदेशीर ठरते. 

या पाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. ब्लॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि मिनरल्स असल्यामुळे कॅलरीज कमी होण्यास मदत होते. हे पाणी फ्री रेडिकल्स कमी करण्यात मदत करतात. त्वचेसह केसांसाठी या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरतं. या पाण्याची किंमत ३ ते ४ हजार रुपये प्रतिलिटर एवढी असते. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे ब्लॅक वॉटर आहे.

...म्हणून ब्लॅक वॉटर!ब्लॅक वॉटरमध्ये पाण्याचे कम्पाउंट्स साध्या पाण्याच्या तुलनेत लहान असतात, म्हणून ते शरीरात लगेच शोषले जातात. त्यामुळे  शरीर जास्त वेळ हायड्रेट राहते. स्नायू जास्त लवकर बळकट होतात. ब्लॅक वॉटर ॲसिडिटी कमी करून शरीरातील पीएच संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. या पाण्यामुळे शरीराच्या विविध अवयवांतून निर्माण होणारे ॲसिड नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया चांगली करते. 

टॅग्स :विराट कोहली
Open in App