विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार अर्धशतक झळकावले. त्याची आकडेवारी ही विस्मयचकित करणारी आहे. तो आणखी किती पुढे जाऊ शकेल हे आता पाहणे आगामी काळात रंजक ठरेल. मी विचार करतो की, त्याच्या उर्वरित कारकिर्दीत हा प्रश्न वारंवार विचारला जाईल. त्याने आता ७ हजार धावांचा टप्पा मागे टाकला. कसोटीतील धावा आणि शतके यांच्या बाबतीत तो आता सचिन तेंडुलकरच्या विक्रमांच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कोहली ३१ वर्षांचा पूर्ण व्हायला अजून एक महिना आहे. तो ७ ते ८ वर्षे शानदार क्रिकेट खेळू शकतो. त्याचा फिटनेस, त्याच्यात असलेली तीव्र महत्त्वाकांक्षा, खेळाबद्दल असलेली निष्ठा यामुळे तो आणखी खूप काही साध्य करू शकतो. तो सध्या तिन्ही प्रारूपात सर्वोत्तम खेळाडू आहे.विराट कोहलीची स्पर्धा आता जो रुट, स्टिव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यासोबत आहे. हे त्याच्या बरोबरीचे समकालीन सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत. कोहलीचे २६ वे शतक हे त्याचे सातवे दुहेरी शतक होते. २०१६ पासून हे त्याच्या कारकिर्दीचा प्रगतीचा आलेख दर्शविते.दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजी आक्रमण हे नक्कीच शानदार होते. तरीही ही फारशी शानदार खेळी मानली जाऊ शकत नाही.कोहलीने कर्णधार म्हणूनदेखील चांगले निर्णय घेतले. तो सहजपणे तिहेरी शतक पूर्ण करू शकत होता. मात्र, त्याने त्याऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना दिवसाच्या अखेरच्या टप्प्यात फलंदाजीस बोलावून बळी मिळविण्याचा निर्णय घेतला. तो कर्णधार म्हणूनदेखील प्रगल्भ असल्याचे त्याने दाखवून दिले. या मालिकेच्या आधी शास्त्री यांनी मला सांगितले होते की, त्याच्यात एक अंत:प्रेरणा आहे. त्यामुळे तो कायमच शिकत असतो. स्टिव्ह स्मिथचे अॅशेजमधील यशामुळे सर्वोत्तम होण्यासाठी तो नक्कीच त्याचा फॉर्म उंचावेल.’स्वत:ला सर्वोत्कृष्ट म्हणून सिद्ध करण्यासाठी कोहली याने नक्कीच यशस्वी प्रयत्न केले आहेत. तो एक कर्णधार म्हणूनदेखील प्रगल्भ होत आहे.
- अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत