Join us  

कोहली, हरमनप्रीत, मानधना ठरले ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला बीसीसीआयने दोन सत्रांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर केला. महिला गटात विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांना हा पुरस्कार दिला जाईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:32 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला बीसीसीआयने दोन सत्रांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर केला. महिला गटात विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांना हा पुरस्कार दिला जाईल.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन सत्रातील कामगिरी पाहता कोहलीला२०१६-१७ आणि २०१७-१८ या मोसमातील पॉली उम्रिगरट्रॉफी देण्यात येईल. पुरस्कार सोहळा बेंगळुरु येथे १२ जून रोजी होणार आहे. कोहलीने २०१६-१७ या सत्रात १३ कसोटीत १३३२ अािण २७ वन डेत १५१६ धावा केल्या. २०१७-१८ मध्ये त्याने सहा कसोटीत ८९६ धावा केल्या. वन डेत त्याची सरासरी ७५.५०अशी राहिली. कोहलीला प्रत्येक सत्रासाठी १५ लाख रोख दिले जातील. हरमनला २०१६-१७ आणि स्मृतीला २०१७-१८ साठी पुरस्कृत केले जाणार आहे.माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चार पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. १६ वर्षे गटाच्या विजय मर्चंट करंडकात सर्वाधिक धावा काढणाºया आणि गडी बाद करणाºया खेळाडूस दालमिया ट्रॉफी दिली जाईल. सर्वोत्कृष्ट ज्युनियर आणि सिनियर महिला खेळाडूला देखील दालमिया ट्रॉफी दिली जाईल.यंदा नऊ गटातील पुरस्कारांची रक्कम एक लाख रुपयांनी वाढविण्यात आली असूनजीवनगौरव पुरस्कारासाठी दिवंगत पंकज रॉय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.बंगाल क्रिकेट संघटनेला २०१६-१७ आणि दिल्ली- जिल्हा क्रिकेट संघटनेला २०१७-१८ साठीसर्वोत्कृष्ट संघांचा पुरस्कार जाहीर झाला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेट