Join us  

विराट कोहली भारतात जन्मलेला ऑस्ट्रेलियान खेळाडू

आक्रमक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाची माध्यमे आणि काही खेळाडू विराट कोहलीवर टीका करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 10:04 PM

Open in App

पुणे, दि. 17 - आक्रमक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाची माध्यमे आणि काही खेळाडू विराट कोहलीवर टीका करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. पण ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यानं विराट कोहलीच्या या आक्रमक वृत्तीचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहली हा ऑस्ट्रेलियन लोकांचा आवडता क्रिकेटपटू आहे, तिथे त्याचा सन्मान केला जातो.  असेही तो म्हणाला. पुण्यातील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कनं विराट कोहलीची स्तुती केली.  तो म्हणाला की, भारतीय कर्णधार विराट कोहलीमध्ये ऑस्ट्रेलियान संघातील खेळाडूसारखा जोश दिसून येतो. मैदानावर तो खूपच आक्रमक क्रिकेट खेळताना दिसून येतो. विराट मैदानावर जेवढा आक्रमक दिसतो त्याच्या विपरित तो मैदानाबाहेर असतो. मैदानावर तो आक्रमक क्रिकेट खेळताना दिसतो पण मैदानाबाहेर तो तेवढाच शांत आणि शालीन असतो. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसीनंही विराटचे कौतुक केलं होतं. हसीनं विराटची तुलना ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराशी केली होती. तो म्हणाला होता की कोहलीचं नेतृत्व हे रिकी पाँटिंगसारखं आक्रमक आहे. कोहली शानदार आहे. त्याच्या नेतृत्वाची पद्धत मला आवडते. त्याची आक्रमक प्रवृत्ती आणि जिंकण्याचा जोश यासाठी मी त्याचा चाहता आहे. संघाला जेवढे पुढे घेऊन जाता येईल, त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतो. त्याने सामना आणि सराव यामध्ये नवा उच्चांक गाठला आहे. जिंकण्याचा निर्धार आणि स्पर्धेची भावना यामध्ये तो पाँटिंगसारखा आहे. असे हसी म्हणाला होता. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, त्यावेळी डीआरएसवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. एका सामन्यात फलंदाजी करताना स्मिथला पंचानी बाद घोषिक केल्यानंतर डीआरएस घेते वेळी त्यानं ड्रेसिंग रुमकडे पाहिल्याचा आरोप विराटनं केला होता. या सामन्यानंतर एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू माझा मित्र नाही असे विराट म्हणाला होता. या मालिकेवेळी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी आणि माजी खेळाडूंनी कोहलीवर विराट टीका केली होती. 

पुढील महिन्यात ऑसी संघ भारत दौ-यावर एकदिवसीय मालिका खेळण्यास येणार आहे.  यामध्ये पाच वनडे आणि तीन टी 20 सामने खेळले जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने सध्या सुरु असलेल्या लंकेविरुद्धच्या मालिकेतून भारताच्या महत्वाच्या चार खेळाडूंना आराम दिला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयमायकेल क्लार्क