मुंबई: अमेरिका- वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली सोमवारी सायंकाळी 6 वा. पत्रकार परिषद घेणार आहे. या परिषदेत विराट रोहितशी मतभेदांबाबत काय स्पष्टीकरण देतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत.
उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. यानंतर विराट व रोहित यांच्या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधान आले. तसेच या सर्व अफवा असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) सांगण्यात आले होते. या चर्चांनंतर विराट प्रथमच पत्रकारांशी संवाद साधणार आहे.
काही दिवसाआधी रोहितने विराटची पत्नी अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर वादाला नवा रंग आला होता. त्यातच अनुष्काने देखील तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टेटस पोस्ट केला. त्यात ''एक बुद्धीवंत व्यक्ती एकदा काहीच प्रतिक्रिया दिली नाही. खोटारडेपणा सुरू असताना केवळ सत्यच संयम राखू शकतो.'' असे म्हणटले आहे.
रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही.
भारतीय संघ कोणत्याही दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार पत्रकार परिषद घेऊन संघाचे धोरण स्पष्ट करतो. सोमवारी रात्री भारतीय क्रिकेट संघ अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी दोन टी- 20 सामने खेळून भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये अखेरचा टी- 20 सामना खेळणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघ आणखी तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या कसोटी संघात निवडलेले खेळाडू काही दिवसांनी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहेत.