नवी दिल्ली : क्षेत्ररक्षणातील बारकावे आणि गोलंदाजीतील बदल याबद्दल तांत्रिकदृष्ट्या भारतीय संघ कमी पडला. यामुळेच इंग्लंडविरुद्धची मालिका ४-१ ने गमविण्याची वेळ आली. कर्णधार विराट कोहलीने तांत्रिक बारकाव्यांत भक्कम होण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
एका टीव्ही वाहिनीशी बोलताना गावस्कर यांनी विराटला बरेच काही शिकण्याची गरज असल्याचे सांगितले. गावस्कर पुढे म्हणाले,‘ द. आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात काही वेळा असे पाहण्यात आले की विराटने सजविलेले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत केलेले बदल यामुळे उभय संघात फार मोठा फरक निर्माण होऊ शकला असता. चार वर्षांपासून नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाºया विराटमध्ये तांत्रिक अनुभवाची उणीव जाणवली.’ गेल्या १५ वर्षांत विदेश दौरा करणारा सध्याचा भारतीय संघ सर्वोत्कृष्ट असल्याचे कोच रवी शास्त्री यांचे मत होते. यावर एका पत्रकाराने काल कोहलीची फिरकी घेतली. कोहलीने उत्तर न देताच त्या पत्रकारालाच तुमचे मत काय, असा प्रतिसवाल केला होता. याबद्दल गावस्कर म्हणाले, ‘त्या’ पत्रकाराने यावेळी असा प्रश्न उपस्थित करायला नको होता. हा प्रश्न विचारण्याची ही वेळ नव्हेच. पराभवामुळे विराट फारच नाराज होता. पत्रकाराचा तो प्रश्न योग्य असेलही पण त्यावेळी माझ्यामते कुणीही कर्णधार तुम्ही बरोबर आणि आम्ही चूक आहोत, असे मान्य करणार नाही, असे माझे मत आहे. या घटनेला कुणीही अधिक महत्त्व देऊ नये, असे गावस्कर यांनी आवाहन केले. असे गावस्कर यांनी स्पष्ट केले.
कोच रवी शास्त्री यांचा उद्देशदेखील माजी खेळाडूंना दुखविण्याचा नव्हताच. सध्याच्या खेळाडूंमध्ये उत्साह संचारण्यासाठी शास्त्रीने हे वक्तव्य केले असावे असे गावस्कर यांना वाटते. याबाबत ते पुढे म्हणाले,‘प्रामाणिकपणे बोलायचे तर सध्याच्या संघाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीच शास्त्री असे बोलले असावेत.’ मागील सर्व संघांना निकृष्ट ठरविण्याचा शास्त्री यांचा हेतू नसावा. कोचचा उद्देश असा कदापि नसावा, या शब्दात गावस्कर यांनी शास्त्री यांच्या वक्तव्याचा बचाव केला.
तांत्रिक बारकाव्यांच्या अभावाने अपयश
विराटचा संघ १-३ ने माघारला असताना तो मालिकेचा शेवट विजयाने करू इच्छित होता. अशावेळी विराटची प्रतिक्रिया अशी येणे स्वाभाविक आहे. त्याला अधिक महत्त्व देऊ नये. पराभवामुळे विराट नाराज असल्यामुळे कदाचित त्याने असे उत्तर दिले असावे.
Web Title: Kohli needs to learn fielding and bowl technique: Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.