कोहली वाईट कर्णधार नाही, पण रोहित अधिक चांगला- गौतम गंभीर

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

By मोरेश्वर येरम | Published: November 24, 2020 12:13 PM2020-11-24T12:13:51+5:302020-11-24T12:16:50+5:30

whatsapp join usJoin us
Kohli is not a bad captain but Rohit is better says Gautam Gambhir | कोहली वाईट कर्णधार नाही, पण रोहित अधिक चांगला- गौतम गंभीर

कोहली वाईट कर्णधार नाही, पण रोहित अधिक चांगला- गौतम गंभीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयपीएलमध्ये रोहितने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय, गंभीरचं मत'रोहित शर्मा संघाला उत्तम नेतृत्त्व देऊ शकतो'कोहली आणि रोहितच्या नेतृत्त्वात खूप मोठा फरक

मुंबई
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीवर महत्वाचं विधान केलंय. ''विराट कोहली वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा अधिक चांगला कर्णधार ठरला असता', असं मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे. 

स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील 'क्रिकेट कनेक्टेड' या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या गुणवत्तेत खूप मोठा फरक आहे. आयपीएलमधील दोघांच्या कर्णधारपदाच्या कामगिरीचा विचार केला पाहिजे, असंही गंभीरने म्हटलंय.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात आयपीएलची ५ जेतेपदं आहेत. तर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप एकदाही जेतेपद मिळवता आलेलं नाही. २०१६ सालच्या आयपीएलमध्ये उपविजेतेपद हीच बंगळुरूच्या संघाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी राहीली आहे. 

''आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर आपण जर भारतीय संघाची निवड करतो. मग संघाचा कर्णधार आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर का निवडला जाऊ नये?'', असा सवाल गंभीरने उपस्थित केला.
 

Web Title: Kohli is not a bad captain but Rohit is better says Gautam Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.