Join us  

टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोहली की रोहित? शोएब अख्तरने मांडले मत

भारतीय संघाला वर्ल्ड कप 2019 स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 2:12 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाला वर्ल्ड कप 2019 स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अनेकांनी रोहित शर्माला मर्यादित षटकांचे कर्णधार पद देण्यात यावे असे मत अनेक दिग्गजांनी मांडले.  

त्यासोबतच मंगळवारी पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील आपली प्रतिक्रिया मांडली आहे. त्याला सोशल मीडियावर विचारण्यात आलेल्या भारतीय संघाबाबतच्या प्रश्नावर आपले मत मांडले आहे. 

त्याला चाहत्यांनी विचारले की, विराट कोहलीचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविण्यात यावे का? या प्रश्नावर शोएबने याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. 

वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्याआधी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सर्व आरोप फेटाळून लावले.

टॅग्स :बीसीसीआयभारतशोएब अख्तरविराट कोहली