मुंबई : क्रिकेटविश्वात आपल्या तुफानी फलंदाजीने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहली याने जाहिरातींच्या विश्वामध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जाहिरातींमधून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू कोहली जागतिक क्रमवारीमध्ये ८३व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार २०१८ साली जाहिरातीतून ‘विराट’ कमाई केलेल्या कोहलीने सर्बियाचा टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच आणि अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार सर्जिओ अग्युरो यांनाही मागे टाकले आहे. मात्र, त्याचवेळी या यादीत अव्वल स्थानी असलेल्या बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याच्या कमाईच्या तुलनेत कोहलीची कमाई केवळ साडेआठ टक्के ठरली.
कोहलीकडे सध्या जगभरातील २१ नामांकित ब्रँडच्या जाहिराती आहेत. यामधून त्याने गेल्या वर्षभरामध्ये तब्बल २४ मिलियन डॉलर (सुमारे १७० कोटी रुपये) इतकी घसघशीत कमाई केली आहे. फोर्ब्सने नुकत्याच जगातील जाहिरात क्षेत्रातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल १०० खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीमध्ये अव्वल स्थानी बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याने तब्बल २८५ मिलियन डॉलरच्या कमाईसह आपले अव्वल स्थान कायम राखले असून दुसºया स्थानी स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (१११ मिलियन डॉलर) आहे. अव्वल १०० खेळाडूंमध्ये केवळ कोहली जगातील एकटा क्रिकेटपटू आहे हे विशेष.
धोनीला टाकणार मागे...
कोहली लवकरच जाहिरातीतून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनीला मागे टाकेल. २०१५ साली भारताचा माजी कर्णधार धोनीने जाहिरात क्षेत्रातून एकूण ३५ मिलियन डॉलरची कमाई केली होती. ३० वर्षीय कोहलीची सध्या सुरू असलेली घोडदौड पाहता हा विक्रम लवकरच तो मागे टाकेल अशी शक्यता आहे.
सोशल मीडियावरही छाप : विराट कोहली सोशल मीडियावरही सतत अॅक्टिव्ह असतो. फेसबुकवर कोहलीचे ३७ मिलियनहून अधिक चाहते आहेत. त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवर २५ मिलियन, तर टिष्ट्वटरवर २७.१ मिलियन
चाहते कोहलीला फॉलो करतात.
सर्वाधिक कमाई करणारे अव्वल १० खेळाडू (डॉलरमध्ये)
फ्लॉयड मेवेदर (२८५ मिलियन) बॉक्सिंग, लिओनेल मेस्सी (१११ मि.) फुटबॉल, ख्रिस्तियानो रोनाल्डो (१०८ मि.) फुटबॉल, कॉनॉर मॅकग्रेगोर (९९ मि.) मिक्स मार्शल आटर््स, नेमार (९० मि.) फुटबॉल, लेबॉर्न जेम्स (८५.५ मि.) बास्केटबॉल. रॉजर फेडरर (७७.२ मि.) टेनिस, स्टीफन करी (७६.९ मि.) बास्केटबॉल, मॅट रायन (६७.३ मि.) फुटबॉल, मॅथ्यू स्टॅफोर्ड (५९.५ मि.) फुटबॉल.
Web Title: Kohli top cricketer on advertising grounds
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.