नवी दिल्ली : मागील दहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांवर वर्चस्व गाजवणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याला ‘द क्रिकेटर’ या पाक्षिकाने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. पाक्षिकाने गेल्या १० वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५० क्रिकेटपटूंची यादी तयार केली असून, त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.
भारताकडून कोहलीसह रविचंद्रन अश्विन १४ व्या, रोहित शर्मा १५ व्या, महेंद्रसिंग धोनी ३५ व्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा ३६ व्या स्थानावर आहे. महिला क्रिकेटपटू मिताली राज ४० व्या स्थानी आहे. कोहलीसंदर्भात या पाक्षिकाने लिहिले, ‘दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोहलीची निवड सर्वसंमतीने झाली. कोहलीने या दशकात अन्य खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक २०,९६० धावा केल्या आहेत.’ सर्वाधिक धावा काढणाºया फलंदाजांच्या यादीत द.आफ्रिकेचा हाशिम अमला दुसºया स्थानावर आहे. त्याने कोहलीपेक्षा पाच हजार धावा कमी केल्या.
सचिन तेंडुलकरने याच दशकात १०० शतकांचा विक्रम रचला. दशकातील आघाडीच्या क्रिकेटपटूंमध्ये कोहलीपाठोपाठ जेम्स अँडरसन, आॅस्ट्रेलियाची महिला खेळाडू एलिस पेरी, स्टीव्ह स्मिथ, हाशिम अमला, केन विलियम्सन, एबी डिव्हिलियर्स, कुमार संगकारा, डेव्हिड वॉर्नर आणि डेल स्टेन यांचा समावेश आहे. अश्विन भारतीयांमध्ये दुसºया स्थानावर आहे. २०१० ते २०१९ या काळात सर्वाधिक गडी बाद करण्यात तो अव्वल स्थानी राहिला. त्याने कसोटीत ३६२ आणि एकदिवसीय सामन्यांत २०२ गडी बाद केले आहेत.सचिनविषयी पाक्षिकाने लिहिले, ‘सचिनने २०१३ मध्ये १०० शतकांसह क्रिकेटला अलविदा केले. त्याचा विक्रम मोडित निघाणार नाही, असे म्हटले जायचे. मात्र कोहली जवळपास ७० शतकांच्या जवळ पोहोचला आहे. कर्णधार या नात्याने त्याने १६६ सामने खेळले. जबाबदारीनुसार त्याची फलंदाजी सतत बहरत आहे.