कोहलीवर नियंत्रण राखण्यासाठी अनेक पर्याय वापरावे लागतील : हेजलवुड

भारताचा फलंदाजी क्रम जगात सर्वोत्तम असला तरी कर्णधार विराट कोहलीवर नियंत्रण मिळवले तर त्यांच्यावर दडपण आणता येईल, असे मत आॅस्ट्रेलियाचा उपकर्णधार व वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:40 AM2018-12-04T04:40:30+5:302018-12-04T04:40:37+5:30

whatsapp join usJoin us
Kohli will have to use several options to keep control: Josh Hazlewood | कोहलीवर नियंत्रण राखण्यासाठी अनेक पर्याय वापरावे लागतील : हेजलवुड

कोहलीवर नियंत्रण राखण्यासाठी अनेक पर्याय वापरावे लागतील : हेजलवुड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅडिलेड : भारताचा फलंदाजी क्रम जगात सर्वोत्तम असला तरी कर्णधार विराट कोहलीवर नियंत्रण मिळवले तर त्यांच्यावर दडपण आणता येईल, असे मत आॅस्ट्रेलियाचा उपकर्णधार व वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने व्यक्त केले.
कोहलीने यापूर्वीच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत चार शतकांसह ६९२ धावा ठोकल्या होत्या. ६ डिसेंबरपासून प्रारंभ होणाºया पहिल्या कसोटीपूर्वी बोलताना हेजलवुड म्हणाला, ‘‘भारतीय फलंदाजी क्रम जगात सर्वोत्तम आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात बरेच क्रिकेट खेळले आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि केवळ विराटला छाप सोडता आली. अन्य फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.’’
कोहलीवर नियंत्रण राखण्यासाठी आमचा संघ योजना तयार करत असल्याचे सांगताना हेजलवुड म्हणाला, ‘‘आम्ही निश्चितच याबाबत चर्चा करू आणि रणनीती तयार करू. त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध अनेक पद्धतींचा वापर करावा लागेल.’’
या पद्धतीमध्ये स्लेजिंगचा समावेश नाही. हेजलवुड पुढे म्हणाला, ‘‘विराटवर याचा प्रभाव पडत नाही. त्यानंतर तो सर्वोत्तम कामगिरी करतो. मी त्याला गोलंदाजी करताना गप्प राहणे पसंत करतो.’’
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारताचे पारडे जड भासत असले तरी हेजलवुडने मालिका बरोबरीची होणार असल्याचे म्हटले आहे. हेजलवुड म्हणाला, ‘‘मालिका बरोबरीची होईल. आमची लढत जगातील अव्वल संघासोबत आहे, पण आम्ही आमच्या देशात चांगला खेळ करतो. आमच्याकडे जगातील कुठल्याही संघाला अडचणीत आणण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांचा समावेश आहे. अ‍ॅशेसची लय जगातील सर्वोत्तम फलंदाजी क्रम असलेल्या संघाविरुद्ध कायम राखण्यास प्रयत्नशील आहोत.’

Web Title: Kohli will have to use several options to keep control: Josh Hazlewood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.