नवी दिल्ली - आज जाहीर झालेल्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व राखलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सला मागे टाकत पहिले स्थान काबीज केले आहे.
विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या शतकी खेळीमुळे क्रमवारीत पहिले मिळाले आहे. विराटच्या खात्यात सध्या 889 गुण असून 872 गुण एबी डिव्हीलियर्सच्या खात्यात आहेत. विराट शिवाय रोहित शर्मा सातव्या, माजी कर्णधार एम.एस. धोनी अकराव्या आणि शिखऱ धवन 15 व्या स्थानावर आहेत. 1998 मध्ये सचिन तेंडुलकर 887 गुणांसह आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिला होता. यानंतर विराट कोहलीने केलेली ही कामगिरी सर्वोत्तम मानली जात आहे.
गोलंदाजीचा विचार करता बुमराहला तिन स्थानाचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. क्रिकेट कार्किर्दीतील त्याची ही सर्वोत्तम रँकीग आहे. बुमराहशिवाह अक्षर पटेल आठव्या स्थानावर आहे. तर भुवनेश्वर कुमार 15 व्या स्थानावर आहे. भुवीला एका स्थानचं नुकसान झालं आहे. गोलंदाजीत पाकिस्तानचा हसन अली प्रथम क्रमांकावर आहे.
तर दुसरीकडे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजही महिलांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. 753 गुणांसह मिताली राजने क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी 725 गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंडची अॅमी सॅटरवेट 720 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महिला विश्वचषकात केलेल्या खेळीचा मिताली राजला फायदा झाल आहेय