दुबई : पाकिस्तानविरुद्ध टीे-२० विश्वषचकात कर्णधार विराट कोहलीने कठीण समयी शानदार फलंदाजी केली, असे दिग्गज सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. कोहलीने ५ चौकार आणि एका षटकारासह ४९ चेंडूत ५७ धावा ठोकल्या होत्या, मात्र भारताने हा सामना दहा गड्यांनी गमावला.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘फॉलो द ब्ल्यूज’या कार्यक्रमात गावसकर म्हणाले,‘पॉवर प्लेगमध्ये सलामीवीर गमावल्यानंतर कोहलीची ती खेळी शानदार होती. डाव सावरणे आणि धावगती वाढवणे ही जबाबदारी खांद्यावर पेलून विराटने अप्रतिम फलंदाजी केली. शाहीन अफ्रिदीच्या चेंडूवर विराटने मारलेला षटकार कमालीचा होता.
शाहीन वेगवान स्विंग मारा करीत असताना कोहलीचे खेळणे गरजेचे होते. क्रिजबाहेर येऊन खेळल्यामुळेच विराट अफ्रिदीच्या चेंडूवर धावा काढू शकला.’
भुवनेश्वरने वेग वाढवावा: ब्रेट ली
हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नसेल, तर भुवनेश्वर कुमार याने चेंडूचा वेग वाढवायला हवा, अशी सूचना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने केली. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतरही भारत उपांत्य फेरी नक्की गाठेल, असा विश्वास व्यक्त करीत ली म्हणाला,‘हार्दिक फिट नसेल, तर विविध पैलूंवर विचार व्हावा. फिट असेल तर मात्र अष्टपैलू या नात्याने हार्दिक संघात असायला हवा. भुवनेश्वरचे वैशिष्टय हे की तो दोन्ही बाजूने स्विंग करू शकतो. जगात फार कमी वेगवान गोलंदाज अशी कमाल करतात.’
Web Title: Kohli's brilliant performance in difficult times: Sunil Gavaskar pdc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.