Join us  

CAA : विराट कोहलीची आसाममधील सामन्यापूर्वी नागरिकत्व कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया, म्हणाला...

CAA : सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:11 PM

Open in App
ठळक मुद्देनववर्षातील भारताचा पहिला सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे.

गुवाहाटी : सध्याच्या घडीला आसाममध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत गदारोळ सुरु आहे. आसाममध्ये याविरोधात जोरदार आंदोलनं सुरु आहेत, त्याचबरोबर काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणही मिळालेले आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार की नाही, याबाबत संदिग्घता होती. पण आता हा सामना कटेकोट सुरक्षाव्यवस्थेमध्ये होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीनेनागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

नववर्षातील भारताचा पहिला सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे. हा सामना ५ जानेवारीला गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. बारासपारा स्टेडियमची क्षमता ३९,५०० प्रेक्षकांची आहे. त्यात २७००० तिकीटे पहिलेच विकली आहेत. सैकिया पुढे म्हणाले,‘नागरिक नाताळ व नव्या वर्षाच्या जल्लोषात मग्न होते आणि आम्हाला शेवटच्या क्षणी तिकीट विक्रीची आशा आहे.’ दुसरा टी२० सामना ७ जानेवारी रोजी इंदूरला, तर तिसरा व अंतिम सामना १० जानेवारी रोजी पुण्यामध्ये खेळला जाणार आहे.

कोहली म्हणाला की, " आम्हाला येथे चांगली सुरक्षा व्यवस्था मिळालेली आहे. या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मला टिप्पणी करणे योग्य वाटत नाही. कारण या कायद्याबाबत मला जास्त माहिती नाही."

Bad News : भारत-श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट

नववर्षातील भारताचा पहिला सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे. हा सामना ५ जानेवारीला गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्याबाबत एक वाईट बातमी आली आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सामना किती षटकांचा खेळवायचा, यावर विचार करायला चाहते सुरु झाले आहेत.

सामन्यादरम्यान पाऊस पडला की, किती षटकांचा सामना खेळवायचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. कारण त्यावर सामन्याचा वेग अवलंबून असतो. पाऊस पडल्यावर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असते.

गुवाहाटीमध्ये सध्याच्या घडीला चांगलीच थंडी पडली आहे. सध्याच्या घडीला गुवाहाटीमध्ये १२ डिग्री एवढे तापमान आहे. जर पाऊस पडला तर या तापमानामध्ये अजून घट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजांना प्रथम फलंदाजी करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध श्रीलंकानागरिकत्व सुधारणा विधेयक