कोलंबो, दि. 14 - श्रीलंकेला फॉलोऑन देऊन दबावाखील आणणा-या भारतीय संघाने आज कसोटी विजयासह इतिहास घडवण्याची नामी संधी साधली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेणा-या भारताने क्लीन स्वीप विजय मिळवला. आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच एका कसोटी मालिकेत सलग ३ सामने जिंकले आहेत. विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली होती.
विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने २०००मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने, तर २००४ व २०१०मध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला होता.
हार्दिक पांड्याच्या पहिल्या कसोटी शतकानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने रविवारी तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात दुसºया दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळत त्यांना फॉलोऑन स्वीकारण्यास भाग पाडले. दुस-या डावात श्रीलंकेचा एक बळी घेत भारताने यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देण्याच्या दिशेने वाटचाल केली.
भारताचा डाव उपाहारानंतर १२२.३ षटकांत ४८७ धावांत संपुष्टात आला. पांड्याने ९६ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची खेळी सजवली. त्याने उमेश यादवसोबत (नाबाद ३) अखेरच्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. पांड्या उपाहारानंतर लक्षण संदाकनच्या (५-१३२) षटकांत तिस-या चेंडूवर बाद झाला. श्रीलंकेच्या या चायनामन गोलंदाजाने सहाव्या कसोटी सामन्यात प्रथमच पाच बळी घेतले.
प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचे फलंदाज सुरुवातीपासून संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. त्यांचा डाव केवळ ३७.४ षटकांत १३५ धावांत संपुष्टात आला. त्या वेळी श्रीलंका संघाला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी ३५२ धावांची गरज होती. भारतीय कर्णधार विराट कोहलीने यजमान संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने दुस-या दिवसअखेर दुस-या डावात १ बाद १९ धावा केल्या होत्या.