कोलंबो, दि. 1 - भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटसेनेवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. दुसऱ्या कसोटीच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रवी शास्त्री यांनी सध्याच्या संघाला आतापर्यंतचा भारताचा सर्वात यशस्वी संघ होऊ शकतो, असे म्हटले. ते म्हणाले, सध्याच्या संघात काही खेळाडू नवखे असले तरी त्यांची खेळण्याविषयीची जिद्द आणि चिकाटी चांगली आहे. गेल्या दोन वर्षात भारतीय संघानं परदेशात आणि भारतात अनेक सामने जिंकले आहेत. नवनवे विक्रम त्यांनी मोडीत काढले आहेत. रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या वर्तमान भारतीय संघाने याआधीच्या संघांना जे जमले नाही ते केलं आहे. ज्या संघामध्ये अनेक दिग्गज नावं सामील आहेत. रवी शात्रीनं हे वक्तव्य करत एकप्रकारे नव्या वादाला तोंड फोडलं आहे.दोन वर्षापासून भारतीय संघ सोबत आहे. या संघात जास्त बदल झालेले नाहीत. दोन वर्षात भारतीय संघाला खूप सारा अनुभव आला आहे. 2015 मध्ये भारतीय संघानं लंकेविरोधात कसोटी मालिका जिंकली होती. विराटसेनेनं २२ वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. काही खेळाडूनं भारतासाठी २० वर्षापेक्षा अधिक क्रिकेट खेळले आहेत. या दरम्यान ते लंकेच्या दौऱ्यावरही गेले पण ते कसोटी मालिका जिंकले का? असा प्रश्न उपस्थित करत रवी शास्त्री यांनी एकप्रकारे सचिन, सौरव, सेहवाग, लक्ष्मण आणि कुंबळे सारख्या दिग्गज खेळाडूंना टोमना मारला आहे.सांघिक कामगिरीमुळे टीम इंडिया यशस्वीभारतीय संघाने गेल्या तीन वर्षांत मिळविलेले यश हे सांघिक असून त्यामध्ये कोणत्याही एकट्या व्यक्तीचे विशेष योगदान नाही. रवी शास्त्री व अनिल कुंबळे येतील आणि जातील; पण आज भारत कसोटीमध्ये अव्वल स्थानावर आहे. याचे सगळे श्रेय खेळाडूंना आहे. मी भूतकाळातील गोष्टी घेऊन पुढे आलेलो नाही. आज भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळविले आहे. श्रीलंकेच्या मागील दौऱ्यापासून आतापर्यंत मी परिपक्व झालो असून, गेल्या दोन आठवड्यांतही खूप परिपक्व झालो आहे. असे भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.मला आव्हान स्वीकारण्याची सवयअनिल कुंबळे यांनी तडकाफडकी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे अनेक वाद निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कितपत आव्हानात्मक असेल या प्रश्नावर शास्त्री म्हणाले की, मला नेहमीच आव्हाने स्वीकारायला आवडतात. जेव्हा तुम्हाला ढगाळ वातवरणात सलामीला जायला सांगितले जाते तेव्हा ते आव्हान असते. मला आव्हाने स्वीकारण्याची सवय आहेशास्त्रीने भारतीय संघाच्या सराव पद्धतीत केला बदलभारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दुसऱ्या कार्यकाळात खेळाडूंच्या तयारी करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल केला आहे. हे आताच सुरू झाले असले तरी त्याचा प्रभाव मात्र ताबडतोब अनुभवाला येत आहे. शास्त्री यांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यात फलंदाज आता फलंदाजीसाठी सज्ज असतात. फलंदाजी क्रमासोबत याचे काही देणे-घेणे नाही. मधल्या फळीतील फलंदाजांसाठी मैदानावर उतरण्यापूर्वी ह्यवॉर्म अपह्ण करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दिग्गजांना जे जमलं नाही ते विराटसेनेनं करून दाखवलं - रवी शास्त्री
दिग्गजांना जे जमलं नाही ते विराटसेनेनं करून दाखवलं - रवी शास्त्री
भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटसेनेवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. दुसऱ्या कसोटीच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 5:50 PM
ठळक मुद्देरवी शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकतेआज भारत कसोटीमध्ये अव्वल स्थानावर आहे. याचे सगळे श्रेय खेळाडूंना आहेमी भूतकाळातील गोष्टी घेऊन पुढे आलेलो नाही. आज भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळविले आहे