कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) नाट्यमय ठरलेल्या लढतीत तब्बल ८१ धावांनी विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (आरसीबी) हातातून सामना खेचून आणला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाताने अडखळत्या सुरुवातीनंतरही २० षटकांत ७ बाद २०४ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी आरसीबीला १७.४ षटकांमध्ये केवळ १२३ धावांत गुंडाळले.
शार्दूल ठाकूर आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आक्रमक अर्धशतक आणि वरुण चक्रवर्थी व सुयश शर्मा यांची शानदार फिरकी कोलकाताच्या विजयात निर्णायक ठरले. धावांचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, पाचव्या षटकात सुनील नरेनने कोहलीला बाद केले आणि यानंतर आरसीबीच्या फलंदाजीला गळती लागली. आरसीबीकडून कोणालाही खेळपट्टीवर फारवेळ तग धरता आला नाही. युवा सुयशने स्वप्नवत आयपीएल पदार्पण करताना आरसीबीची हवा काढली. चक्रवर्थीनेही प्रमुख फलंदाजांना बाद करत कोलकाताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याआधी, शार्दूलने आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर सलामीवीर रहमानुल्लाहने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याच्यामुळे काहीसे पुनरागमन केलेल्या कोलकाताला शार्दुलने भक्कम स्थितीत आणताना स्फोटक अर्धशतक झळकावले. त्यामुळे एकवेळ १४० धावाही कठीण दिसत असलेल्या कोलकाताने द्विशतक झळकावले. कोलकाताने अर्धा संघ ८९ धावांत गमावला होता.
गुरबाझने रिंकू सिंगसोबत ३१ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केल्यानंतर शार्दुलने रिंकूसोबत सहाव्या गड्यासाठी ४७ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी केली. शार्दूलने अवघ्या २० चेंडूत आयपीएलमधील पहिलेच वैयक्तिक अर्धशतक झळकावले.
सुहाना-शनायाची उपस्थिती
केकेआरचा मालक शाहरूख खान, त्याची मुलगी सुहाना खान आणि पीए पूजा दादलानी यांच्यासह शनाया कपूर हे सर्व जण ईडन गार्डन्सवर उपस्थित होते. त्यावेळी सुहाना आणि शनायाच्या उपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली.
Web Title: Kolkata beat RCB with big margin Bollywood Actress Hot Suhana Khan Shanaya Kapoor become talk of town
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.