nitish rana, ipl 2023 । कोलकाता : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जला पराभवाची धूळ चारली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंगने विजयी चौकार मारून सामना आपल्या नावावर केला. या विजयामुळे केकेआरचा संघ अद्याप प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे. खरं तर रिंकू सिंग पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघासाठी काळ ठरला. रिंकूने १० चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार मारला.
विजयानंतर केकेआरचा कर्णधार नितीश राणाला मोठा फटका बसला आहे. कारण आयपीएलच्या नियमानुसार वेळेत षटके न टाकल्यामुळे केकेआरच्या संघाला दंड आकारला गेला आहे. त्यामुळे कर्णधार नितीश राणाला १२ लाख रूपये भरावे लागणार आहेत. आयपीएलच्या आचार संहितेनुसार राणाची या हंगामातील ही पहिलीच चूक आहे. त्यामुळे त्याला १२ लाख रूपये मोजावे लागणार आहेत.
"मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया
रिंकू सिंगचा विजयी चौकार
काल शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी २७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी नोंदवली. कोलकाताला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात ५ गडी गमावून पूर्ण केले. केकेआरला शेवटच्या षटकात सहा धावांची आवश्यकता होती. ६ धावांचा बचाव करण्यासाठी पंजाबचा कर्णधार शिखर धवनने अर्शदीप सिंगकडे चेंडू सोपवला. अर्शदीपने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्या बाजूने ठेवला पण रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
विजयामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
कालच्या विजयामुळे केकेआरचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहिला आहे. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. आता केकेआरचा संघ १० गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत.
रिंकू-रिंकू...! मैदानात एकच जल्लोष; रसेलनकडून विकेटचा त्याग, विजयानंतर केला 'प्रेमाचा वर्षाव'
Web Title: kolkata knight riders captain Nitish Rana faces Rs.12 lakh fine for maintaining slow over-rate during their match against Punjab Kings in ipl 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.