Join us  

IPL 2023 : एक ही दिल कितनी बार जितोगे! 'पठाण' शाहरूख खान ५ वर्षानंतर दिव्यांग फॅनला भेटला, Video

IPL 2023 : बॉलिवूड सुपर स्टार शाहरूख खान याने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या सामन्याला हजेरी लावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 5:27 PM

Open in App

IPL 2023 : बॉलिवूड सुपर स्टार शाहरूख खान याने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या सामन्याला हजेरी लावली. १४३८ दिवसानंतर कोलकाताचा संघ त्यांच्या घरच्या प्रेक्षकांमसोर खेळला अन् RCB वर दणदणीत विजय मिळवून चाहत्यांना खूश केले. २०१८नंतर प्रथमच आयपीएलमध्ये होम-अवे फॉरमॅट परतला आहे. या सामन्यानंतर शाहरूखने स्टेडियमवर येत खेळाडूंची भेट घेतली आणि त्यात तो सुपर फॅनला नाही विसरला. २०१८नंतर प्रथमच येथे होणारी मॅच पाहण्यासाठी हर्षूल मैदानावर उपस्थित होता आणि शाहरूखने त्याची आवर्जुन भेट घेतली आणि त्याच्या मथळ्यावर किस केलं.  

घरी आजारी वडील, आईने क्रिकेट न खेळण्यास बजावले; पण, सुयश शर्माने 'पठाण'समोर जग जिंकले! सोशल मीडियावर शाहरूखच्या फॅन्सनी हा व्हिडीओ व्हायरल केला अन् चाहत्यांनी 'पठाण'ला पुन्हा डोक्यावर घेतला. व्हिलचेअर बसलेल्या दिव्यांग हर्षूलचाही आनंद गगनात मावेनासा झाला. हर्षूल मैदानावर आला आणि शाहरूखने त्याला मैदानावर आल्याबद्दल आभार मानले. चाहत्यानेही आय लव्ह यू म्हणत प्रेम व्यक्त केले.   

इडन गार्डनवर 'पठाण' शाहरूख खानच्या उपस्थितीत KKR ने दमदार खेळ करून दाखवला. त्यांच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी हार मानली, परंतु 'लॉर्ड' शार्दूल त्यांच्यासाठी धावून आला. शार्दूलने २९ चेंडूंत ९ चौकार व ३ उत्तुंग षटकार खेचून ६८ धावा चोपल्या आणि त्याला रिंकू सिंगची ( ४६) खणखणीत साथ मिळाली. रहमनुल्लाह गुरबाझने ५७ धावा केल्या. KKR ने ५ बाद ८९ वरून ७ बाद २०४ धावांपर्यंत आश्चर्यकारकरित्या झेप घेतली.

विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिसने ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यात डरकाळी फोडली होती, ती पाहून इडन गार्डनवर धमाका होईल असे वाटले होते. पण, कोहली व फॅफ हे दोन्ही बार फुसके निघाले. सुनील नरीनने अप्रतिम चेंडूवर विराटचा (२१) त्रिफळा उडवला. वरुण चक्रवर्थीनेही फॅफची ( २३) दांडी गुल केली. त्यानंतर RCB चा डाव १२३ धावांवर गडगडला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३शाहरुख खानकोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरऑफ द फिल्ड
Open in App